भारताचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंग आपल्या वक्तव्यांमुळे सध्या सतत चर्चेत आहे. आर. अश्विनबद्दल त्याने केलेल्या वक्तव्यानंतर आता त्याने भारताचा युवा फलंदाज रिंकु सिंगविषयी आपल मत व्यक्त केले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने रिंकु सिंग विषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
आयपीएल 2023 मध्ये रिंकू सिंग (Rinku Singh) याने धडाकेबाज फलंदाजी केली होती. तेव्हापासुन सगळीकडेच त्याची ख्याती पसरली आहे. यानंतर रिंकू सिंगची वर्णी भारतीय संघात सुद्धा लागली. 2023 च्या आयपीएल हंगामात रिंकू सिंगने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबादच्या सामन्यात शेवटच्या षटकात 5 षटकार मारुन संघाला विजय मिळवून दिला होता. भारतीय संघासाठीसुद्धा त्याच्याकडून अशीच कामगिरी सुरु आहे.
रिंकु सिंगमध्ये मी स्वतःला पाहतो – युवराज सिंग
युवराजने रिंकुचे तोंडभरुन कौतुक केले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “रिंकु सिंग यावेळी भारतीय संघातला सर्वोत्कृष्ट डावखुरा फलंदाज आहे. हा खेळाडू मला माझी आठवण करुन देतो. त्याला माहीत आहे केव्हा खेळ करायचा, केव्हा स्ट्राइक रोटेट करायची. शिवाय दबावाच्या परिस्थितीत तो जबरदस्त खेळतो. तो संघाला अनेक सामने जिंकून देऊ शकतो. मला त्याच्यावर दबाव टाकायचा नाहीये, पण त्याच्यात एवढी पात्रता आहे की तो ते सर्व करु शकतो जे मी माझ्या कारकिर्दीत केले. तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फिनिशरची भूमीका चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो.” (rinku-singh-reminds-me-of-myself-yuvraj-singh-praises-young-batter)
अफगानिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेचा रिंकु सिंग भाग आहे. यासोबतच त्याने 2024चा टी20 विश्वचषक खेळण्याची इच्छा देखील बोलुन दाखवली आहे. तो म्हणाला विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली तर मी प्रभाव टाकण्यासाठी तयार आहे.
महत्वाच्या बातम्या
NZ vs PAK । कर्णधार विलियम्सनला पुन्हा दुखापत, न्यूझीलंड संघ आणि चाहत्यांच वाढलं टेंशन
आता फक्त 8 दिवसांची प्रतीक्षा’, प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठे आधी पाकिस्तानातून जय श्रीरामचा नारा