सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामात युवा भारतीय खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसून येत आहेत. प्रत्येक संघाचे प्रत्येकी एक किंवा दोन खेळाडू आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले. कोलकाता नाईट रायडर्ससाठी तीन सामन्यात महत्त्वाचे योगदान दिलेला रिंकू सिंग याचे नाव सध्या प्रत्येकाच्याच ओठी आहे. त्याचवेळी रिंकू नये आपल्या खेळासोबतच आता केलेल्या एका कृतीमुळे अनेकांची मने जिंकली आहेत.
रिंकू मागील चार वर्षापासून आयपीएलचा भाग आहे. केकेआर संघाने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला प्रत्येक हंगामात संधी दिली. त्याने एक दोन सामन्यात संघासाठी निर्णायक खेळ देखील दाखवला होता. मात्र, यावर्षी गुजरात टायटन्सविरुद्ध केकेआरला अखेरच्या पाच चेंडूंवर 28 धावांची गरज असताना रिंकूने सलग पाच षटकार ठोकत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीनंतर त्याने आता युवा खेळाडूंसाठी मोफत क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.
https://twitter.com/KKRSince2011/status/1648040651878174720?t=_kGgwHUIdL6oUJi0t93yoQ&s=19
रिंकू सिंग उत्तर प्रदेशातील अलीगड या शहरातून येतो. क्रिकेट खेळण्यासाठी त्याला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जावे लागले. इतकेच नव्हे तर सफाई कामगाराची नोकरी देखील त्याला मिळाली होती. मात्र, या सर्वांवर मात करत तो यशस्वी ठरला. आपल्या प्रमाणेच परिस्थिती इतरांवर येऊ नये यासाठी रिंकूने अलीगड येथे 50 लाख रुपयांची गुंतवणूक करत, होतकरू क्रिकेटपटूंसाठी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी खेळाडूंना मोफत क्रिकेट प्रशिक्षण देखील दिले जाईल.
या वसतिगृहात 14 खोल्या असतील. यामध्ये प्रत्येकी चार खेळाडू राहतील. तसेच स्वतंत्र स्वच्छतागृह व स्वयंपाक घर देखील या ठिकाणी उपलब्ध असेल. पुढील महिन्यात या वस्तीगृहाचे उद्घाटन करण्यात येईल. रिंकूने उचललेल्या या सामाजिक कार्यासाठी अनेकांनी त्याला शुभेच्छा देखील
(Rinku Singh To Inaugurated Hostel And Free Training For Poor Budding Cricketers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नो-बॉलचा मारा करताच पंचांनी हर्षलला गोलंदाजी करण्यापासून का रोखले? ‘हे’ आहे कारण
आयपीएल 2023मधून मोठी बातमी! LSG vs CSK सामन्याच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या कारण