भारतात सध्या इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाची धामधूम सुरू आहे. या हंगामात अनेक युवा खेळाडूंबरोबरच काही अनुभवी दिग्गज खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये कुलदीप यादव याचाही समावेश आहे. २७ वर्षीय कुलदीप यादवने आयपीएलच्या १५ व्या हंगामात पहिल्या सामन्यापासून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्याने त्याच्या चांगल्या कामगिरीमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याचेही योगदान असल्याचे सांगितले आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) पॉडकास्टमध्ये कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) सांगितले की, रिषभ पंत (Rishabh Pant) त्याला एमएस धोनीप्रमाणेच (MS Dhoni) यष्टीमागून मार्गदर्शन करत असतो. कुलदीपने आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) आत्तापर्यंत ७ सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आहेत.
कुलदीप म्हणाला, ‘मला वाटते रिषभ पंत एमएस धोनीच्या यष्टीमागील गुणांची झलक दाखवत आहे. तो चांगले मार्गदर्शन करतो आणि मैदानात शांत असतो. फिरकीपटूंच्या यशात यष्टीरक्षकांची महत्त्वाची भूमिका असते.’
धोनी जोपर्यंत भारतीय संघात होता, तोपर्यंत त्याने अनेकदा कुलदीपला यष्टीमागून मार्गदर्शन केले आहे. तसेच कुलदीपलाही त्या काळात मोठे यश मिळाले होते. मात्र, त्यानंतर कुलदीपची कामगिरी खालावली होती. पण, आता त्याने खराब फॉर्ममधून चांगले पुनरागमन केले असून तो आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी करत आहे. यासाठी त्याने रिषभ पंतलाही श्रेय दिले आहे.
कुलदीप म्हणाला, ‘माझी आयपीएलमध्ये जशी कामगिरी होत आहे, त्याचे श्रेय रिषभ पंतला देखील जाते. आमच्यात चांगले सांमजस्य आहे.’ त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनचीही मोठी मदत झाल्याचे कुलदीपने सांगितले. तो म्हणाला, ‘शेन वॉटसननेही माझी खूप मदत केली. मला आनंद आहे की, मी वॉटसनबरोबर ३-४ सत्रात काम केले. त्याने मला खेळाच्या मानसिकतेबाबत बरीच मदत केली. मी त्याला खूप गोष्टी सांगितल्या. मी त्याला संघाशी जोडला जाण्यापूर्वी कोणत्या परिस्थितीतून गेला आहे, हे सांगितले. मी त्याच्याशी खुलेपणाने चर्चा केली.’
कुलदीप सध्या आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत १८ विकेट्ससह युजवेंद्र चहल अव्वल क्रमांकावर आहे. तसेच १५ विकेट्ससह टी नटराजन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
इकडे मुंबई इंडियन्स सलग ८ वी मॅच हरली अन् तिकडे रोहितची बाबर आझमशी तुलना सुरू झाली
‘मी देखील बेजबाबदार खेळलो,’ रोहितने मुंबईच्या सलग ८ व्या पराभावानंतर मान्य केली चूक
चेन्नईविरुद्ध २ धावा अन् शिखर गाठणार आयपीएलमधील मोठा पल्ला, केवळ विराटलाच जमलाय ‘तो’ विक्रम