भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमवाल्यानंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिका सुद्धा गमावली आहे. बोलंड पार्क येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा सात विकेट्सने पराभव झाला आहे. यासह दक्षिण आफ्रिका संघाने २-० अशी आघाडी मिळवली आहे.
आता भारतीय संघावर क्लीन स्विपचा धोका निर्माण झाला आहे. एकदिवसीय मालिकेतील खेळाडूंची खराब फलंदाजी हे पराभवाचे प्रमुख कारण ठरले आहे. संघाच्या खराब फलंदाजीमुळे सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ साजेशी कामगिरी शकला नाही आणि त्यांना पराभवाचा फटका संघाला सहन करावा लागला आहे. याला अपवाद ठरला रिषभ पंत (Rishabh Pant).
व्हिडिओ पाहा- अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले
रिषभ पंतने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघांसाठी शानदार फलंदाजी केली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंतशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष कामागिरी करता आली नाही. या सामन्यात त्याने 85 धावांची उत्तम खेळी करत 10 चौकार आणि 2 षटकार मारले. पण या सामन्यात त्याच्या अनेक शॉट्सवर भाष्य करताना खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर रिषभ पंत म्हणाला की, “तो त्याच्या खेळीवर खूश आहे. पण त्याच्या शॉट्समध्ये ज्या उणीवा होत्या, त्या भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे.”
रिषभ पंतने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, “मी प्रशिक्षक आणि सहयोगी खेळाडूंसोबत चर्चा केली की मी कुठे सुधारणा करू शकतो आणि खेळाच्या महत्त्वपूर्ण भागांमध्ये मला फलंदाजी कशी सुरू ठेवता येईल? एक व्यक्ती म्हणून मी काय करू शकतो यावर नेहमीच सकारात्मक चर्चा होत असते. मी संयमाने कसे खेळू शकतो आणि आम्ही परिस्थितीनुसार यावर चर्चा करतो. या चर्चांनंतर आम्ही सराव करतो आणि नंतर सामन्यांमधून आम्ही शिकलेल्या गोष्टी लागू करण्याचा प्रयत्न करतो.”
रिषभ पंत पुढे म्हणाला की, “चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचे कारण म्हणजे जर डाव्या हाताच्या फलंदाजाला मध्यभागी संधी मिळाल्यास उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांच्या संयोजनाने स्ट्राईक रोटेट करणे सोपे जाईल. विशेषत: मधल्या षटकांमध्ये जेव्हा लेग स्पिनर किंवा डाव्या हाताचा फिरकी गोलंदाजी करतात.”
महत्वाच्या बातम्या-
‘यंग टीम इंडिया’ची विजयी घोडदौड सुरूच! युगांडाला ३२६ धावांनी धूळ चारत गाठली उपांत्यपूर्व फेरी
नमन ओझाच्या शतकावर भारी पडले इमरान ताहिरचे अर्धशतक, वर्ल्ड जायंट्सने ३ विकेट्सने जिंकली मॅच
अफगानी कर्णधार त्याच्या मुलासोबत खेळू इच्छितोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट; म्हणाला, ‘आशा आहे की आम्ही…’
हेही पाहा-