अफगाणिस्तान (Afghanistan Cricket Team) आणि नेदरलंड यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. अफगाणिस्तान टी-२० संघाचा कर्णधार मोहम्मद नबी (mohammad nabi) याने युवकांना संधी मिळण्यासाठी या मालिकेतून माघार घेतली. अशात शारजाह सीबीएफएस टी-२० मध्ये त्याला स्वतःच्या मुलासोबत सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याच्या मुलाचे नाव हसन खान आहे आणि तो स्पर्धेत बुखातिरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होता. नबीला याठिकाणी आमंत्रित केले गेले होते आणि त्याला मुलासोबत खेळण्याचा योगही आला.
हसन खानला मागच्या वर्षी क्रिकेट अकादमीत दाखल केले गेले आहे. मात्र टी-२० संघात खेळण्याची संधी मिळताच त्याने ती स्वीकारली आणि सामन्यातील प्रदर्शनामुळे त्याला सर्वांकडून कौतुक देखील मिळाले. यावेळी मोहम्मद नबीने त्याला अजून काही वर्ष राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करायचे असल्याचे सांगितले.
व्हिडिओ पाहा- अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले
तो मुलासोबत खेळण्याविषयी म्हणाला की, “मला आशा आहे की, आम्ही एक दिवस एकत्र खेळू आणि एकत्र राष्टीय संघात देखील खेळू. मी अजून काही वर्ष अफगाणिस्तानसाठी खेळू इच्छितो आणि लीगमध्ये सहभागी राहण्याचा प्रयत्न करेल.”
मुलगा राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची आहे अपेक्षा
मोहम्मद नबीला आशा आहे की, त्याचा मुलगा भविष्यात १९ वर्षाखालील संघात खेळले आणि नंतर राष्ट्रीय संघात देखील स्थान बनवेल. तो पुढे बोलताना म्हणाला की, “आशा आहे की हसन पुढे जाऊन १९ वर्षाखालील संघात खेळले. जर त्याच्यात राष्ट्रीय संघात खेळण्याची क्षमता असेल, तर आशा आहे की, तो राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करेल. एका लीगमध्ये हा पहिलाच प्रसंग आहे, जेव्हा आम्ही एकत्र खेळलो आहोत, हे चांगले होते. तो दबावात होता. पण ही चांगली गुणवत्ता आहे.”
नबीने त्याच्या वडिलांच्या विरोधात जाऊन पाकिस्तानमध्ये रेफ्यूजी कॅम्पमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. पण त्याची इच्छा आहे की मुलाने सर्वश्रेष्ठ क्रिकेट अकादमीत सराव करावा.
“माझे कुटुंब आम्हाला खेळण्याची परवानगी देत नव्हते. पण मला माहीत होते की, हसनमध्ये चांगली गुणवत्ता आहे, ज्यामुळे मी त्याला अधिक संधी देऊ इच्छितो. माझ्या लहानपणी माझ्याकडे काहीच नव्हते. परंतु त्याच्याकडे सर्व गोष्टी आहेत. हे एकदम वेगळे आहे. मी त्याला सांगितले आहे, जेव्हा मी क्रिकेट शिकत होतो, तेव्हा अशा सुविधा नव्हत्या. मला अकादमीत जाण्याची परवानगी नव्हती,” असे नबीने पुढे बोलताना सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
हे कोरोना! टीम इंडियाच्या बहुप्रतिक्षित मालिका आयोजनात करावे लागले बदल; वाचा सविस्तर
नमन ओझाची झंझावाती शतकी खेळी; लिजेंड्स लीगचा पहिला शतकवीर होण्याचा मिळविला मान
लिलावात सहभागी होण्यापूर्वीच चेन्नईला मोठा धक्का; ज्याच्यावर होती नजर, त्याचीच लिलावातून माघार
व्हिडिओ पाहा –