Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video: नाचण्यास कारण ‘पंत’! शुन्यावर आऊट होऊनही ड्रेसिंग रूममध्ये नाचत होता विराट

Video: नाचण्यास कारण 'पंत'! शुन्यावर आऊट होऊनही ड्रेसिंग रूममध्ये नाचत होता विराट

January 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
Virat Kohli

Photo Courtesy: Twitter


भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) शून्य धावांवर बाद झाला. परंतु, तरीही  ड्रेसिंग रुममध्ये गेल्यावर विराट नाचताना दिसला. विराट कोहली आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) बाद झाल्यानंतर केएल राहुल (KL Rahul) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांना भारताचा डाव सांभाळला होता आणि फटकेबाजी केली होती. याच वेळी विराट त्यांच्या फलंदाजीच्या आनंदात नाचताना दिसला.

उभय संघातील या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट एकही धाव करू शकला नाही. दक्षिण अफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने विराटची विकेट घेतली. एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट पहिल्यांदाज एका फिरकी गोलंदाजाकडून शून्य धावांवर बाद झाला आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०१९ नंतर पहिल्यांदाच शून्य धावांवर तंबूत परतला आहे.

असे असले तरी, विराट हा पंत आणि केएल राहुल यांची फलंदाजी पाहून आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले. आनंदात तो शिखर धवनला डान्स करून दाखवत होता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंत आणि राहुलने या सामन्यात १११ चेंडूत ११५ धावांची भागीदारी केली.

#SAvIND pic.twitter.com/JdFNw5rPnY

— Ankit Jit Singh (@JitAnkit) January 21, 2022

Virat kohli is such a mood 🤣✨ pic.twitter.com/yjC6XTlJIw

— Siddhi 🙂 (@_sectumsempra18) January 21, 2022

सेंच्युरियनमध्ये पहिल्या कसोटीतील विजयानंतरही खेळाडूंनी केला होता डान्स 
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला गेला होता. यामध्ये भारताने ११३ धावांनी विजय मिळवल्यानंतर खेळाडू हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसोबत नाचताना दिसले होते. यावेळी विराट आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा डान्स पाहायला मिळाला होता. मोहम्मद सिराज, चेतेश्वर पुजारा आणि रविचंद्रन अश्विन यांनी हा डान्स सुरू केला हेता. पहिल्या कसोटीतील विजयानंतर खेळाडूंना साजरा केलेल्या आनंदाचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेला.

दरम्यान, दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने अवघ्या ६४ धावांवर त्याच्या दोन महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर चौथ्या क्रमांवर फलंदाजीला आलेल्या पंतने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आणि ४३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने सर्वाधिक ८५ धावंची खेळी केली, तर केएल राहुलने ५५ धावा केल्या. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ५० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर २८७ धावा केल्या.

मात्र, नंतर फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने जानेमन मलान आणि क्विंटॉन डी कॉक यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर ४८.१ षटकात ३ विकेट्स गमावत २८८ धावा करत सामना जिंकला. मलानने ९१ धावांची, तर डी कॉकने ७८ धावांनी खेळी केली. त्यांना कर्णधार तेंबा बावूमा (३५), एडेन मार्करम (३७*) आणि रस्सी वॅन डर ड्यूसेन (३७*) यांनी चांगली साथ दिली.

महत्वाच्या बातम्या –

चांगल्या कामगिरीनंतरही बाऊचरची होणार दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी? गंभीर कारण आले समोर

‘झिरो’मुळे विराटचा सोशल मीडियावर होतोय बाजार, मीम्स व्हायरल करत चाहते साधतायत निशाणा

पंतच्या ‘पॉवरफुल’ खेळीने रचले विक्रमांचे इमले; दक्षिण आफ्रिकेत फक्त रिषभचाच डंका

व्हिडिओ पाहा –


ADVERTISEMENT
Next Post
Andre Russell

बाबो! क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात तुम्ही असं कुणाला आऊट झालेलं पाहिलं नसेल, सतत पाहाल व्हिडिओ

ipl-trophy

बीसीसीआयकडून महत्वाची बैठक आयोजित, आयपीएल २०२२ विषयी होणार 'हे' निर्णय

kohli-in-sa

जिथे धोनी, गांगुलीसारखे कर्णधार दक्षिण आफ्रिकेच्या पेपरमध्ये झालेत फेल, तिथंच विराट आलाय अव्वल

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.