---Advertisement---

‘कर्णधार’ म्हणून पहिली टी२० मालिका जिंकण्याची पंतकडे संधी, सीरिज गमावल्यास मोडेल ‘तो’ अजेय विक्रम

On: रविवार, जून 19, 2022 10:12 AM
Rishabh-Pant-Cuttak
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. ही मालिका सध्या रोमांचक स्थितीत आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी २ सामने जिंकले असून मालिका २-२ अशी बरोबरीत आहे. अशात रविवारी (१९ जून) एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे दोन्ही संघात पाचवा आणि अखेरचा टी२० सामना होणार आहे, जो निर्णायक असेल. या सामन्यात भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रिषभ पंत याच्याकडे इतिहास रचण्याची संधी असेल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांकडे पाचव्या टी२० सामन्यात इतिहास रचण्याची संधी असेल. वर्ष २०१९ पासून भारतीय संघाने भारतभूमीत एकही द्विपक्षीय टी२० मालिका गमावलेली नाही. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही २०११ पासून भारतात एकही मालिका गमावलेली नाही. अशात आता पाचवा टी२० सामना जिंकत ही दोन्ही संघ ही अपराजित राहण्याची मालिका तोडण्यावर लक्ष केंद्रित करतील. याखेरीज कर्णधार म्हणून आपली पहिलीवहिली टी२० मालिका जिंकण्याची विक्रमी कामगिरीही पंत आपल्या नावावर करण्यासाठी उत्सुक असेल.

दरम्यान यजमान भारतीय संघाने पराभवासह या टी२० मालिकेची सुरुवात केली होती. दिल्लीत झालेला पहिला टी२० सामना दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर कटक येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यातही भारतीय संघाचा ४ विकेट्सने पराभव झाला होता.

मात्र त्यानंतर तिसरा टी२० सामना जिंकण्यात भारतीय संघाला यश आले आणि त्यांनी मालिकेत दमदार पुनरागमन केले. विशाखापट्टणममध्ये झालेला हा सामना भारतीय संघाने ४८ धावांनी जिंकत मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. त्यानंतर राजकोटवरील चौथा टी२० सामना ८२ धावांनी जिंकत भारतीय संघाने मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे.

संभाव्य संघ-

दक्षिण आफ्रिका-
टेम्बा बावुमा (कर्णधार)/ रीझा हेन्ड्रिक्स, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेविड मिलर, हेन्रिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, मार्को जेन्सन/कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, तबरेझ शम्सी, एन्रिच नॉर्किया

भारत-
ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

कर्णधार पंतपुढे टी२० मालिका वाचवण्याचे आव्हान, निर्णायक सामन्यात कोणाचे पारडे जड? पाहा प्लेइंग Xi

भारीच ना! थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीच पूर्ण केली होती मिल्खा सिंग यांची प्रेमकहाणी; असं जुळलं होतं सूत

VIDEO । चेन्नईच्या चाहत्यांचा नाद नाय राव!, भारताच्या सामन्यांतही घुमला सीएसकेचा जयघोष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---