भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्यावर उत्तराखंड रसकारने मोठी जबाबदारी टाकली आहे. तरुणांचा खेळ आणि फिटनेस या गोष्टींकडेचा कल वाढावा यासाठी राज्य सरकाराने पंतला ही जाबाबदारी सोपवली आहे. पंता आता उत्तराखंड राज्याचा ब्रँड एम्बेसेडर नियुक्त केले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी स्वतः याविषयी माहिती दिली.
मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी (Pushkar Singh Dhami) दिल्ली स्थित उत्तराखंड सदनात गुरुवारी (११ ऑगस्ट) पंतला सन्मानित करणार असल्याचे समोर येत आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) मुळचा उत्तराखंडचा राहणारा असल्यामुळे त्याला राज्याच्या ब्रँड एम्बेसिडरपदी नियुक्त केले जाईल, असे सांगितले जात आहे. पंत उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील रुडकीमध्ये लहानाचा मोठा झाला आहे. पुढे त्याने दिल्लीच्या रणजी संघाचे प्रतिनिधित्व केले.
पुष्कर सिंग धामी यांनी स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून पंतला राज्याच्या ब्रँड एम्बेसेडरपदी नियुक्त केल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, “देशाचा सुपुत्र आणि भारतीय क्रिकेट संघाचा प्रतिभावान खेळाडू रिषभ पंत याला उत्तराखंडच्या युवकांना खेळ आणि फिटनेसकडे प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ‘राज्य ब्रँड एम्बेसेडर’ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.” ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांनी पंतला ही नवीन जबाबदारी पार पाडण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
प्रदेश सरकार ने देवभूमि के सपूत एवं भारतीय क्रिकेट टीम के प्रतिभावान खिलाड़ी @RishabhPant17 जी को उत्तराखण्ड के युवाओं को खेलकूद एवं जन स्वास्थ्य के प्रति प्रोत्साहित किए जाने के उद्देश्य से "राज्य ब्रांड एम्बेसडर" नियुक्त करने का निर्णय लिया है।
आपको हार्दिक शुभकामनाएं ! pic.twitter.com/2NP1lZ5pga
— Pushkar Singh Dhami (Modi Ka Parivar) (@pushkardhami) August 10, 2022
दरम्यान, पंतचे वय सध्या अवघे २४ वर्ष आहे. एवढ्या कमी वयात त्याने सर्वात आधी भारतीय संघात स्वतःचे नियमित स्थान पक्के केले आहे आणि आता उत्तराखंडचा ब्रँढ एम्बेसेडर बनला आहे. पंत खऱ्या अर्थाने युवा खेळाडूंणा प्रेरणा देणारा खेळाडू ठरत आहे. यापूर्वी भारताचा महान कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) उत्तरखंड राज्याचा ब्रँड एम्बेसेडर राहिला आहे.
पंतच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत भारतासाठी ३१ कसोटी, २७ एकदिवसीय आणि ५४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या फॅरमॅटमध्ये त्याने अनुक्रमे २१२३, ८४० आणि ८८३ धावा केल्या आहेत. पंतने ऑस्ट्रेलियातील गाबा स्टेडियमवर केकेली खेळी नेहमीच लक्षात राहण्यासारखी होती. त्याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली होती. काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा पंतने भारतीय संघाच्या कर्णधारपदाचीही भूमिका पार पाडली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सलाम तुमच्या कामगिरीला! १९८३ च्या विश्वचषकात भारतासाठी नायक ठरलेले ‘यशपाल शर्मा’
“पाकिस्तानला एशिया कपची पर्वा नाही, फक्त २-३ सामन्यात भारताला हरवायचे आहे”
पुन्हा एकदा सुंदरच्या मानगुटीवर दुखापतीचे भूत; झिम्बाब्वे दौऱ्याला मुकण्याची शक्यता