---Advertisement---

IND vs ENG: रिषभ पंतची शतकी खेळी, धोनीचा ऐतिहासिक विक्रम मोडला!

---Advertisement---

इंग्लंडच्या मैदानावर रिषभ पंतने (Rishbh Pant) शानदार पारी खेळत शतक झळकावले आहे. उपकर्णधार पदाची जबाबदारी सांभाळत रिषभने लीड्सच्या मैदानावर धमाकेदार शतक झळकावले आहे. यष्टीरक्षक फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे 7 वे शतक पूर्ण केलेले आहे. त्याने षटकारासोबत त्याचे शतक पूर्ण केले. यासोबतच पंत यष्टीरक्षक म्हणून सर्वात जास्त शतक झळकावणारा भारतीय फलंदाज ठरलेला आहे. त्याने या कामगिरीत एम एस धोनीला (MS Dhoni) मागे टाकले आहे. रिषभच्या खेळीसमोर इंग्लंडचे गोलंदाज पूर्णपणे हताश दिसून आले.

पहिल्या दिवशी 65 धावा करून नाबाद राहिलेल्या रिषभ पंतने दुसऱ्या दिवशी सुद्धा याच अंदाजात ताबडतोब फलंदाज केली. त्याने कर्णधार शुबमन गिलसोबत (Shubman gill) मिळून इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच धुवा उडवला. पण त्याशिवाय शोएब बशीरच्या एका षटकात पहिल्यांदा चौकार आणि परत षटकार झळकावला. त्याने त्याचे शतक 139 चेंडूत पूर्ण केले आहे. या शतकांसोबतच रिषभ पंत भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा यष्टिरक्षक फलंदाज ठरलेला आहे. रिषभ पंतला कर्णधार गिलची चांगली साथ मिळाली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---