सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका संपल्यानंतर येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून तयारी करताना दिसून येत आहेत. दरम्यान, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच रिषभ पंतला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ हे दोन्ही संघ युएईला रवाना झाले आहेत. दरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर संघापूर्वीच यूएईला पोहोचला असून त्याने जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघासमोर प्रश्न उपस्थित झाला असेल की आयपीएलच्या उर्वरित हंगामात संघाचे कर्णधारपद कोणाला द्यावे.
आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद रिषभ पंतला देण्यात आले होते. परंतु, आता श्रेयस अय्यरचे पुनरागमन होत असल्यामुळे रिषभ पंतला आपले कर्णधारपद गमवावे लागू शकते. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२० स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. तर रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित होण्यावेळी गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर होता.(Rishabh Pant captaincy in trouble, Shreyas Iyer started practicing in Dubai)
https://www.instagram.com/p/CSvopNfhhmf/
यावर्षी इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यर क्षेत्ररक्षण करत असताना गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे त्याला वनडे मालिकेतून आणि आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
तो आता दुखापतीतून बाहेर आला असून त्याने युएईमध्ये प्रशिक्षक प्रवीण आमरेसह सरावाला सुरुवात केली आहे. एका सूत्राने सांगितले आहे की, “श्रेयसने सरावाला सुरुवात केली असून नेट गोलंदाज उपलब्ध नसल्यामुळे प्रवीण आमरे त्याला मदत करत आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या –
मोहम्मद सिराजला ‘या’ कारणामुळे देण्यात आला नव्हता सामनावीर पुरस्कार, माजी भारतीय क्रिकेटपटूचा खुलासा
मुंबई, चेन्नई पाठोपाठ सनरायझर्स हैदराबाद संघही यूएईसाठी भरारी घेण्यास सज्ज; ‘या’ दिवशी होणार रवाना
अँजेल्यू मॅथ्यूजला मिळाले नाही श्रीलंकेच्या वार्षिक करारात स्थान, निलंबित खेळाडूही यादीतून बाहेर






