भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा आज (०६ मार्च) तिसरा दिवस असून भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना कोडींत पकडले आहे. दरम्यान भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलच्या चेंडूवर इंग्लंडचा फलंदाज ओली पोप यष्टीचीत झाला. भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतने काही क्षणातच अप्रतिम पद्धतीने त्याची यष्टी उडवली. यावेळचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
त्याचे झाले असे की, आघाडीचे चार फलंदाज माघारी परतल्यानंतर पोप संघनायक जो रुटसोबत मिळून डावास चालना देत होता. अशात डावातील २५ वे षटक टाकण्यासाठी फिरकी गोलंदाज अक्षर आला. त्याच्या षटकातील पाचव्या चेंडूवर पोप क्रिजवरील सीमारेषेच्या पुढे येत मोठा शॉट मारायला गेला. परंतु चेंडू त्याच्या बॅटवर व्यवस्थित बसला नाही आणि सरळ यष्टीमागे गेला.
यावेळी पंतने अगदी छातीवर आलेला चेंडू पकडला आणि क्षणाचाही विलंब न करता यष्टीला लावला. दुसरीकडे पोपने वेगाने मागे फिरत सीमारेषेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु तोवर फार उशीर झाल्याने तो यष्टीचीत झाला. यामुळे ३१ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १५ धावा करत त्याला पव्हेलिनला परतावे लागले.
https://twitter.com/gupta_ritikaa/status/1368112596218343424?s=20
https://twitter.com/Yorker_Gawd/status/1368111418134851586?s=20
पोपनंतर कर्णधार रुटही पुढील षटकात आपली विकेट गमावून बसला. भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने २५.१ षटकात त्याला त्रिफळाचीत केले. आता डॅनियल लॉरेन्स आणि बेन फोक्स नाबाद फलंदाजी करत आहेत. इंग्लंड संघ रुटची विकेट गमावल्यानंतर ६ बाद ६५ धावा अशा स्थितीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: तू यष्टीमागे इतकी बडबड का करतो? रोहितच्या प्रश्नावर रिषभचे मन जिंकणारे उत्तर
किती ते दुर्दैव! कोणीही साथीदार न उरल्याने सुंदर नव्वदीत नाबाद, ‘या’ भारतीयांवरही आलीय अशी वेळ





