रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 37 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. दुसऱ्या डावात तो अद्याप फलंदाजीला आलेला नाही. पण त्याने आपल्या दमदार क्षेत्ररक्षणाने अनोखे शतक झळकावले आहे. पंतची गणना सर्वोत्तम भारतीय यष्टीरक्षकांमध्ये केली जाते आणि मैदानावरील त्याची चपळता पाहण्यासारखी आहे. तो विकेटच्या मागे उभा राहून गोलंदाजांना सूचना देतानाही दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कचे झेल घेतले. यासह त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात त्याचे 100 बाद (कॅच + स्टंपिंग) पूर्ण केले आहेत. त्याच्या आधी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाला 100 बाद पूर्ण करता आले नव्हते. आता पंतने हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
रिषभ पंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात 100 बाद करणारा तिसरा यष्टिरक्षक ठरला आहे. त्याच्या आधी ॲलेक्स कॅरी (137 बाद) आणि जोशुआ डी सिल्वा (108 बाद) यांनी ही कामगिरी केली होती. पंतने डब्ल्यूटीसी मध्ये आतापर्यंत 87 झेल आणि 13 स्टंपिंग केले आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक बाद करणारा यष्टिरक्षक:
ॲलेक्स कॅरी: 137 (125 झेल आणि 12 स्टंपिंग)
जोशुआ डी सिल्वा: 108 (103 झेल आणि 5 स्टंपिंग)
रिषभ पंत: 100 (87 झेल आणि 13 स्टंपिंग)
टॉम ब्लंडेल: 90 (78 झेल आणि 12 स्टंपिंग)
मोहम्मद रिझवान: 87 (80 झेल आणि 7 स्टंपिंग)
रिषभ पंतने 2018 साली भारतीय संघात पदार्पण केले होते. यानंतर, त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 39 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 2730 धावा केल्या आहेत. पंतने कसोटीत 6 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत. तो त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलण्यात तो माहीर आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने केवळ 150 धावा केल्या होत्या. तर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 104 धावा केल्या. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावाच्या आधारे 46 धावांची आघाडी मिळाली. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 172 धावा केल्या आहेत. अशा प्रकारे टीम इंडियाची एकूण आघाडी 218 धावांची झाली आहे.
हेही वाचा-
IND vs AUS; बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीसाठी रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना
जीव वाचवणाऱ्या 2 लोकांना नाही विसरला पंत! महागडं गिफ्ट देऊन जिंकली मनं
IND vs AUS; उत्कृष्ट खेळीनंतर यशस्वी जयस्वालचा चाहता झाला ‘हा’ दिग्गज खेळाडू!