---Advertisement---

स्पायडरमॅन, स्पायडरमॅन! जिममध्ये रिषभ पंतची मस्ती, पाहा मजेदार व्हिडिओ

On: शनिवार, फेब्रुवारी 20, 2021 2:52 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रिषभ पंत याला यष्टीच्या मागे झेल टिपण्यासाठी उडताना सर्वांनीच पहिलं. सोबतच त्याची यष्टीमागील मस्तीशीही सर्वजण परिचित आहेत. नुकताच भारतीय संघाचा युवा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याने जिममधील पंतचा एक गमतीदार व्हिडिओ ट्विटर हॅन्डलवर शेअर केला आहे.

रिषभ पंतने केली स्पायडरमॅनची नक्कल
या व्हिडिओत भारतीय खेळाडू जिममध्ये सराव करत असताना दुसरीकडे पंत हा स्पायडरमॅनची नक्कल करताना दिसत आहे. यावेळी तो जमिनीवर स्पाडरमॅनप्रमाणे चालत आहे. तसेच व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला स्पायडरमॅन, स्पायडरमॅन असे गीत देखील सुरू आहे. हा व्हिडिओ सुंदरयाने आपल्या ट्विटर हॅन्डलवर शेअर केला आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध बजावली मोलाची भूमिका
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफी मध्ये २-१ ने मालिका जिंकण्यात रिषभ पंतने महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने, ऑस्ट्रेलियन संघाकडून सामना हिसकावून घेतला होता. त्यांनतर भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतदेखील तो उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. फलंदाजीबरोबर यष्टिरक्षणातही तो महत्वाची भूमिका बजावत आहे.

https://twitter.com/Sundarwashi5/status/1362773363182116870?s=20

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी मोटेरा स्टेडियम सज्ज
भारत-इंग्लंड यांच्यातील पहिले २ कसोटी सामने संपले आहेत. त्यानंतर मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी दोन्हीही संघ अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. तिसरा कसोटी सामना हा डे-नाईट सामना असणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणजेच मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत दोन्हीही संघ १ -१ च्या बरोबरीत आहे. अशातच तिसरा सामना हा दोन्हीही संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ‘व्वा हनुमा’, आयपीएल लिलावात मात्र ‘ना-ना’!! अनसोल्ड राहिल्यानंतर विहारीने दिली प्रतिक्रिया

किती ते दुर्दैव! एका षटकात दिले ५ षटकार अन् हिरोचा झाला झिरो, आयपीएल लिलावातही मिळाला नारळ

दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका! आयपीएल सोडून देशासाठी क्रिकेट खेळणार कागिसो रबाडा?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---