भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतला 24 ऑक्टोबरला विंडीज विरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली.
सध्या सुरू असलेल्या वनडे मालिकेत फलंदाज म्हणून संघात निवड करण्यात आलेल्या पंतला बॉंड्रीलाईनवर क्षेत्ररक्षण करताना खांद्याची दुखापत झाली.
गुवाहाटीमधील पराभवानंतर विंडीज संघाने विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात उत्कृष्ठ खेळ करत सामना बरोबरीत आणला.
या सामन्यात प्रथम फंलदाजीला आलेल्या विंडीज संघातील रोवमन पॉवेलने सामन्याच्या 36व्या षटकात युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर खेचून शॉट मारला. यावेळी हा चेंडू उंचावर गेल्याने त्याचा झेल बॉंड्रीलाईनवर उभा असलेल्या 20 वर्षीय पंतने पकडण्याचा प्रयत्न करत असताना तो बॉंड्रीलाईनच्या बाहेर असलेल्या होर्डींगला जोरात आदळला. यावेळी त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली.
पंतची दुखापत बघून फिजियो ताबडतोब मैदानात आले. त्याची ही दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकले नाही. तसेच तो पुढच्या सामन्यात 11 जणांमध्ये आणि या मालिकेत पुढे खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उमटले आहे. सध्यातरी बीसीसीआयने याबद्दल कोणतेच स्पष्टीकरण दिलेले नाही.
पंतने विंडीज विरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात प्रत्येकी 94 धावांची उत्तम खेळी केली होती. यामुळे त्याला वनडे सामन्याच्या मालिकेतही संघात निवडले आहे.
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने वनडेतील 37वे शतक करताना नाबाद 157 धावांची खेळी केली.
https://twitter.com/ghanta_10/status/1055114118909321216
महत्त्वाच्या बातम्या:
–मुंबई पोलिसांनी अनोख्या अंदाजात केले विराट कोहलीचे कौतुक
–भारताच्या या दिग्गजाने वतर्वले भविष्य; लवकरच विराट मोडणार सचिनचा हा विक्रम
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ड्वेन ब्रावोबद्दल या 10 गोष्टी माहित आहेत का?