---Advertisement---

अखेर पंतला दाखवला गेला बाहेरचा रस्ता! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांमधून मिळाला डच्चू

On: बुधवार, डिसेंबर 28, 2022 12:12 AM
---Advertisement---

नव्या वर्षात सुरू होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे व टी20 मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्मा तर टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या हा करताना दिसेल. असे असताना या संघात अनेक महत्त्वाचे बदल पाहण्यास मिळाले. मागील बऱ्याच काळापासून संघात यष्टीरक्षकाची भूमिका बजावणार रिषभ पंत या दोन्ही मालिकांसाठी संघात आपली जागा बनवण्यात अपयशी ठरला. 

चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या दोन्ही संघात पंत याला जागा दिलेली नाही. इंग्लंड दौऱ्यावरील चांगल्या कामगिरीनंतर पंत आपल्या कामगिरीत सातत्य राखू शकला नाही. टी20 विश्वचषक व न्यूझीलंड दौऱ्यावर तो अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता. त्यामुळेच त्याला संघातून वगळल्याचे बोलले जात आहे. मात्र, बीसीसीआयने त्याला विश्रांती दिल्याचे कारण सांगितले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो एनसीएत काही वेळ घालवेल असे सांगण्यात आले आहे. परंतु, तो मागील काही काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये नसल्याचे देखील बीसीसीआयकडून मान्य करण्यात आले.

पंतने यावर्षी 24 टी20 सामने खेळताना 21.35 च्या सरासरीने 363 धावा केल्या. यामध्ये केवळ एका अर्धशतकाचा समावेश होता. वनडे क्रिकेटमध्ये यावर्षी त्याने 12 वनडेच्या 10 डावात 336 धावा केल्या होत्या. त्याच्या यात सातत्याने होत असलेल्या खराब कामगिरीमुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली जात होती. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एकट्याच्या जीवावर सामने भारताला जिंकून दिले आहेत.

सध्या भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून अनेक पर्याय दिसून येतात. या मालिकेसाठी केएल राहुल व‌ ईशान किशन हे वनडे मालिकेचा भाग आहेत. तर, संजू सॅमसन हा टी20 मालिकेत खेळताना दिसेल.

(Rishabh Pant Dropped From ODI And T20I Against Srilanka)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅमेरून ग्रीन दुखापतीमुळे 5 महिने क्रिकेटपासून दूर? मुंबईचे 17 कोटी पाण्यात 

मोठी बातमी: कसोटी आणि वनडे क्रिकेटसाठी विराट टी20 मधून घेणार ब्रेक? 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---