ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाने आपल्या सराव सामन्यांना सुरुवात केली आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ दाखवत 13 धावांनी विजय साजरा केला. सूर्यकुमार यादव तसेच सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा विजय सुकर झाला. मात्र, भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला.
विश्वचषकाची तयारी आणखी जोमात व्हावी यासाठी भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) स्पर्धेच्या सराव सामन्यांव्यतिरिक्त आणखी दोन सराव सामने आयोजित करण्याविषयी विनंती केली होती. त्यानुसार वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत संघाविरुद्ध हे दोन सराव सामने खेळले जातील. यातील पहिला सामना सोमवारी (10 ऑक्टोबर) खेळला गेला.
या सामन्यात भारतीय संघासाठी रोहित शर्मा व रिषभ पंत यांनी सलामी दिली. विश्वचषकासाठी संघात निवड झाल्यापासूनच टीकेचा धनी ठरत असलेल्या रिषभला या सामन्यात स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती. तो इंग्लंड दौऱ्यापासून सातत्याने अपयशी ठरतोय. या सामन्यात सलामीला संधी दिल्यानंतर तो पुन्हा एकदा फेल झाला. त्याने 17 चेंडूंचा सामना करत केवळ 9 धावांवर तंबूचा रस्ता धरला. त्यामुळे त्याला विश्वचषकात संधी मिळणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सामन्याचा विचार केला गेला तर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव च्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर 158 धावा उभारल्या. त्यानंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाची खराब सुरुवात झाली. अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांनी भेदक गोलंदाजी करत भारतीय संघाचा विजय सुनिश्चित केला. भारतीय संघ दोन दिवसानंतर याच संघाविरुद्ध आणखी एक सराव सामना खेळेल. त्यानंतर विश्वचषकाआधी न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला सराव सामने खेळायचे आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हिला डाला ना! मैदान तर गाजवलंच, आता ‘माही भाईं’चा डोळा फिल्म इंडस्ट्रीवर; सुरू केलं प्रोडक्शन हाऊस
मूर्ती लहान, कीर्ती महान! इशानने 24 वर्षांच्या वयात केला ‘हा’ पराक्रम, ‘माही भाई’ टेबल टॉपर