---Advertisement---

सुपर फ्लॉप फलंदाजांच्या यादीत रहाणे-पूजाराच नव्हे, तर ‘या’ भारतीय फलंदाजाचाही होतोय समावेश

On: मंगळवार, जानेवारी 4, 2022 9:17 AM
team-india-test
---Advertisement---

जोहान्सबर्गच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील (South Africa vs India) ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या (३ जानेवारी) दिवशी भारतीय संघातील फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या २०२ धावांवर संपुष्टात आला आहे. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) नंतर आणखी एक फलंदाज आहे, जो सतत फ्लॉप ठरतोय.

जोहान्सबर्ग (Johannesburg) कसोटी सामन्यात भारतीय संघातील दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)  पुन्हा एकदा फ्लॉप ठरले आहेत. तसेच रिषभ पंत देखील पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे.

गेल्या वर्षात रिषभ पंतने १३ कसोटी सामन्यात ३८.२५ च्या सरासरीने ७६५ धावा केल्या होत्या. रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या सरासरीत जास्त अंतर नाही. रिषभ पंतला अनेकदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली, जेव्हा भारतीय संघ अडचणीत होता. परंतु, तो मोठी खेळी न करता माघारी परतला.(Rushabh pant flop show in 2021)

रिषभ पंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असला, तरीदेखील कसोटी क्रिकेटमध्ये त्याला सातत्य कायम ठेवण्यात अपयश आले आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपले शेवटचे शतक मार्च २०२१ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात झळकावले होते. त्यानंतर त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले आहे. हे अर्धशतक त्याने इंग्लंड संघाविरुद्ध ओव्हलमध्ये झळकावले होते. याच कामगिरीमुळे त्याच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.

भारतीय संघाकडे वृद्धिमान साहा, केएस भारत, संजू सॅमसन आणि ईशान किशन सारखे उत्कृष्ट यष्टिरक्षक फलंदाजांचे पर्याय आहेत. त्यामुळे यांच्यातील खेळाडूंना संधी देण्याची देखील मागणी गेल्या काही दिवसात चाहत्यांकडून होताना दिसत आहे.

तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना २०२ धावा करण्यात यश आले आहे. या डावात रिषभ पंतला ४३ चेंडूंमध्ये अवघ्या १७ धावा करण्यात यश आले आहे. यादरम्यान त्याने केवळ एक चौकार मारला आहे.

महत्वाच्या बातम्या :

“फिक्सर खेळाडूंना दिला जातो मान”; निवृत्तीनंतर हफीजने काढले पीसीबीचे वाभाडे

पुजारा-रहाणेचा पुन्हा एकदा ‘फ्लॉप शो’! भारतीय दिग्गज म्हणतोय, “दुसरा डाव…”

हे नक्की पाहा : 

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---