दीर्घकाळ कसोटी क्रिकेटपासून दूर असलेला रिषभ पंत (Rishabh Pant) आता या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. पंत सध्या दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये खेळत आहे. या स्पर्धेत तो जुन्या लयीत परतण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. भारत ब संघाकडून खेळताना पंतने आपल्या झंझावाती फलंदाजीसह यष्टीमागेही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दरम्यान त्याचा यष्टीमागील एक झेल सध्या चर्चेत आला आहे.
पंतने भारत अ विरुद्धच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी विकेटच्या मागे एक अप्रतिम झेल घेतला. त्याने अगदी अलगद हवेत उडी मारत हा झेल पूर्ण केला. या नेत्रदिपक झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बीसीसीआय डोमेस्टिकने हा व्हिडिओ एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. या 14 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये आवेश खान नवदीप सैनीच्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. चेंडू बॅटच्या बाहेरील कडा घेतो आणि यष्टीमागे जातो. यावर यष्टीरक्षक पंत चटकन हवेत डाइव्ह मारतो आणि चेंडू पकडतो. वाऱ्याच्या वेगाने पंतने हा झेल टिपल्याचे दिसते. परिणामी आवेश खानला 11 चेंडूंचा सामना करत फक्त 3 धावांवर पव्हेलियनला परतावे लागले.
WHAT A STUNNER FROM PANT. 🔥
– Pant, the rise as a WK has been remarkable….!!!! pic.twitter.com/RW5N7yRKIl
— Johns. (@CricCrazyJohns) September 8, 2024
यष्टीरक्षणाबरोबरच पंत दुलीप ट्रॉफीत वेगवान फलंदाजीही करताना दिसला आहे. पंतने भारत अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या डावात 47 चेंडूत 129.79 च्या स्ट्राईक रेटने 61 धावा केल्या. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. पंतने पहिल्या डावात 10 चेंडूत 7 धावा केल्या होत्या. त्याची लय पाहता 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पंतला भारतीय संघात पुन्हा संधी मिळण्याच्या दाट शक्यता आहेत. पंतने 2022 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
दुलीप ट्रॉफीतून खेळाडू किती पैसे कमावतात? विजेत्या आणि उपविजेत्यांच्या बक्षिस रकमेतही वाढ
‘या’ दिग्गजाला ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघात स्थान मिळालंच पाहिजे, माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा
लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजाची भारतीय संघात निवड, कसोटी मालिकेसाठी खास जबाबदारी