ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ आगामी इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया 3 टी20 आणि 5 एकदिवसीय सामने खेळणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मार्क टेलरने (Mark Taylor) दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) ऑस्ट्रेलिया टी20 संघात परत घेण्याची मागणी केली आहे. स्मिथ ऑस्ट्रेलियन टी20 संघात पुनरागमन करण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करत आहे.
नाईनच्या वाईड वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स शोमध्ये मार्क टेलर (Mark Taylor) म्हणाला, “ऑस्ट्रेलिया आता डेव्हिड वॉर्नरच्या जागी काय करते हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. यावेळी अधिकाधिक फलंदाजांचा समावेश करण्याची चर्चा असल्याचे दिसते. शेवटी एक फलंदाज बाद होईल. मला वाटते की ही योजना थोडी अवघड आहे, कारण मला स्टीव्ह स्मिथला आमच्या संघात परत पाहायचे आहे.”
पुढे बोलताना टेलर म्हणाला, “नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात आपण पाहिल्याप्रमाणे संथ खेळपट्टी मिळाल्यास, त्यावेळी आम्हाला मधल्या फळीत स्टीव्ह स्मिथसारख्या खेळाडूची गरज होती. मला अजूनही वाटते की जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज सर्वच फॉरमॅटमध्ये चांगली फलंदाजी करतील, त्यामुळे वॉर्नर नसेल तर दुसऱ्या कोणत्या तरी फलंदाजाला संधी द्यावी, अशी भीती वाटते.’
शेवटी बोलताना टेलर म्हणाला की, “ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी स्टीव्ह स्मिथला संघात परत आणण्याबाबत विचार करावा, जेणेकरून संघाला संथ खेळपट्ट्यांवर स्थिरता मिळेल. सपाट खेळपट्टीवर तुमच्या सर्व फलंदाजांना निश्चितपणे मैदानात उतरवा आणि 200 धावा करण्याचा प्रयत्न करा.”
स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने ऑस्ट्रेलियासाठी 67 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 24.86च्या सरासरीने 1,094 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 125.45 राहिला आहे. टी20 मध्ये त्याने 5 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 90 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजाची भारतीय संघात निवड, कसोटी मालिकेसाठी खास जबाबदारी
दुलीप ट्राॅफीमधून भारताला मिळणार युवा धुरंधर, लवकरच करणार पदार्पण?
कोण आहे हा 4 फुट उंचीचा पॅरा ॲथलीट, ज्यानं देशासाठी सुवर्णपदक जिंकलं?