टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022)च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने प्रवेश केला आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडचे आव्हान असणार आहे. त्यातच या मोठ्या सामन्याच्या आधी भारताचा युवा यष्टीरक्षक खेळाडू रिषभ पंत याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंत आणि एका चाहत्याची शाब्दिक चकमक बघायला मिळाली.
हा व्हिडिओ सध्याच्या विश्वचषकातील आहे, ज्यात रिषभ पंत (Rishabh Pant) सीमारेषेजवळ ड्रिंक्स आणि टॉवेल घेऊन उभा होता. त्यातच त्याला एका चाहत्याने उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिच्या नावाने उपहासात्मकरीत्या चिडवले. या चाहत्याने म्हटले की,” भावा, तुला उर्वशी बोलवतीये.” हे ऐकल्यानंतर पंतचा पारा चढला आणि त्याने चाहत्याला तडकाफडकी उत्तर देऊन टाकले. तो म्हटला की,”तू जाऊन भेट मग.” पंत आणि चाहत्यामध्ये झालेल्या या शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने शेअर होत आहे.
"Bhai urwashi bula Rahi………"
Rishab : "Jake mil le fir"🤣 pic.twitter.com/3kjIj6yMBb
— #tujarebaba (@rohit45virat18) November 7, 2022
पंतला या विश्वचषकात प्लेईंग इलेवनमध्ये खूप कमी संधी मिळाल्या आहेत. त्याला झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिक दुखापतग्रस्त असल्याने संधी मिळाली होती. माजी दिग्गज खेळाडू आणि क्रिकेट समोलोचक रवी शास्त्री यांनी पंतला उपांत्य फेरीत इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात संधी मिळायला हवी अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते उपांत्य फेरीच्या सामन्यात दिनश कार्तिकच्या ऐवजी रिषभ पंतला संधी मिळायला हवी. त्याचबरोबर ते असेही म्हटले की रिषभ पंत एक्स फॅक्टर आहे. दिनेश कार्तिक एक चांगला सांघिक खेळाडू आहे. मात्र, इंग्लंड आणि न्यूझीलंड सारख्या संघांचे गोलंदाजी आक्रमण बघता पंत संघासाठी चांगला पर्याय आहे.
जर पंतला संघात खेळवण्यात आले तर डावखुऱ्या फलंदाजाची पोकळी भरुन निघेल. या आधी पंतला सुपर-12 फेरीच्या एकाच सामन्यात संधी देण्यात आलेली. झिम्बाब्वे विरुद्धच्या या सामन्यात तो केवळ 3 धावा करून बाद झाला होता. आता उपांत्य सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळते की नाही, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: युरोपियन क्रिकेटमध्ये गोलंदाजाने केल्या दोन मोठ्या चुका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘कोंबडी पकड’
धक्कादायक! भारताचे प्रतिनिधित्व करणारे पुण्याचे पहिले हॉकीपटू बूडल यांचे निधन, क्रीडाविश्वावर शोककळा