---Advertisement---

IND vs ENG: इंग्लंडमध्ये फलंदाजीसाठी रिषभ पंतने आखला खास प्लॅन! म्हणाला…

On: गुरूवार, जून 19, 2025 12:08 PM
---Advertisement---

India vs England Test Series: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. जिथे भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. ज्याची सुरूवात उद्यापासून म्हणजेच शुक्रवार 20 जूनपासून होणार आहे. उद्या दोन्ही संघातील पहिला सामना लीड्समध्ये खेळला जाईल. या मालिकेसाठी भारतीय संघ नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसेल. त्याच वेळी संघाचा नवा उपकर्णधार रिषभ पंत देखील महत्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे.

यादरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रिषभ पंतने एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. यात त्याने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला आणि शुबमन गिलचेही कौतुक केले. तसेच, इंग्लंडमधील स्विंगचा (Swing Bowling) सामना करण्यासाठी पंतने एक खास योजना आखली आहे, ज्याचा उल्लेखही त्याने पत्रकार परिषदेत केला. (Rishabh Pant Press Conference)

या मालिकेत उपकर्णधार रिषभ पंतवर फलंदाजी करताना मोठी जबाबदारी असणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) आता संघाचा भाग नाहीत, त्यामुळे पंतला मोठी भूमिका बजावावी लागेल. पत्रकार परिषदेत पंतने आपल्या फलंदाजी शैलीबद्दल बोलताना सांगितले, “इंग्लंडमध्ये थोडे साइड-ऑन खेळावे लागते, ज्यामुळे खूप मदत मिळते. वनडे आणि टी20 मध्ये स्टांस थोडा ओपन ठेवावा लागतो, जो तुमच्या शॉट खेळण्यावर अवलंबून असतो. ही टेकनिक गोष्ट मी बदलली आहे.” (Rishabh Pant Batting Technique)

पुढे बोलताना पंत म्हणाला, “जेव्हा तुम्ही क्रीजवर असता, तेव्हा तुम्ही कर्णधार, उपकर्णधार किंवा वरिष्ठ खेळाडू आहात असा विचार केला जात नाही. क्रीजवर तुम्ही फक्त एक फलंदाज असता, ज्याला संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची असते. मला उपकर्णधार म्हणून अतिरिक्त जबाबदारी मिळाली असली तरी, मी अजूनही माझी मानसिकता बदललेली नाही.”

भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलबद्दल बोलताना पंत म्हणाला, “शुबमन आणि माझ्यामध्ये मैदानाबाहेरही खूप चांगली मैत्री आहे. जर तुम्ही मैदानाबाहेर चांगले मित्र असाल, तर ही मैत्री मैदानावरही चांगली होते. ही अशी गोष्ट आहे, ज्यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे.” (Rishabh Pant On Shubman Gill )

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---