भारताचा स्टार डावखुरा फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. सोमवारी (20 जानेवारी) रोजी पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. लखनऊचे कर्णधारपद मिळाल्यानंतर भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
लखनऊ फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून नियुक्त झाल्यानंतर रिषभ पंत (Rishabh Pant) म्हणाला, “हो, मी अनेक कर्णधारांकडून आणि माझ्या अनेक वरिष्ठ खेळाडूंकडून नेतृत्वाबद्दल शिकलो आहे. कारण माझा असा विश्वास आहे की तुम्ही फक्त तुमच्या कर्णधाराकडूनच शिकू नये. खेळ ज्या पद्धतीने प्रगती करत आहे ते पाहता, खेळाचा अनुभव असलेले बरेच वरिष्ठ खेळाडू आहेत, तुम्ही केवळ कर्णधाराकडूनच नाही तर सर्व वरिष्ठ खेळाडूंकडून बरेच काही शिकू शकता.”
रोहितच्या नेतृत्वाखालील अनुभवातून प्रेरणा घेत, पंतने संघाचे नेतृत्व करताना काळजी आणि विश्वासाचे महत्त्व सांगत तो म्हणाला, “खूप अचूक असणे कठीण आहे, रोहित भाईसोबत मी खेळाडूची काळजी कशी घ्यावी हे शिकलो आहे. हे घडते आणि जेव्हा मी संघाचे नेतृत्व करतो तेव्हा मला कर्णधारासारखेच वाटते. जर तुम्ही एखाद्या खेळाडूवर विश्वास दाखवला तर तो तुमच्यासाठी आणि संघासाठी अशा गोष्टी करेल ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आम्हाला ही विचारसरणी स्वीकारायला आवडेल, असा माझा विश्वास आहे.”
रिषभ पंतच्या (Rishabh Pant) आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 111 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 35.31च्या सरासरीने 3,284 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 148.93 आहे. आयपीएलमध्ये पंतने 18 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे, त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 128 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीचे रणजी सामने खेळणे झाले निश्चित, रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
रिषभ पंतनंतर अजिंक्य रहाणेही झाला कर्णधार, ‘या’ संघाची धुरा सांभाळणार
IPL 2025; ‘या’ 3 कारणांमुळे लखनऊने केलं रिषभ पंतला कर्णधार..!