---Advertisement---

भारतीय क्रिकेटसाठी सर्वात आनंदाची बातमी! रिषभ पंतकडून फलंदाजीला सुरुवात, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, ऑगस्ट 16, 2023 2:03 PM
Rishabh Pant batting
---Advertisement---

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत झटपट बरा होत आहे. मागच्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. पण यष्टीरक्षक फलंदाजाने अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने स्वतः या दुखापतीतून सावरले आहे. पंतचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो फलंदाजी करताना दिसत आहे. तब्बल सात-आठ महिन्यांमध्ये पंत पहिल्यांदा फलंदाजी करत असल्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

डिसेंबर 2022च्या शेवटच्या आठवड्यात पंत दिल्लीवरून आपल्या घरी रुडकीला चालला होता. पहाटेच्या वेळी त्याचा कारचा भिषण अपघात झाला. अपघातामध्ये फंतची गाडी जळून खाक झाली. पण सुदैवाने पंत आधीच गाडीतून बाहेर पडला होता. मात्र, थ्याच्या संपूर्ण शरीराला ठिकठिकाणी दुखापत झाली होती. त्याच्यावर काही शस्त्रक्रिया झाल्या आणि त्यानंतर तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला. बेंरलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पंत मागच्या काही महिन्यांपासून फिटनेसवर काम करत आहे.

रिषभ पंत क्रिकेटच्या मैदानात मागच्या मोठ्या काळापासून दिसला नव्हता. पण आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून चाहत्यांना वेळोवेळी फिटनेसविषयी माहिती देत राहिला. दरम्यानच्या काळात पंतने जिममध्ये घाम घाळताना आणि पायऱ्यांवर चालतानाचे व्हिडिओ शेअर केले, जे चांगलेच व्हायरल देखील झाले होते. पण अपघातानंतर पहिल्यांताच पंत फलंदाजी करताना दिसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप कमी वेळात जोरदार व्हायरल झाला आहे.

रिषभ पंत मर्यादित षटकांमध्ये भारताचा महत्वाचा फलंदाज आहेच. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आफली खास छाप सोडली. भारतासाठी त्याने 33 कसोटी, 30 वनडे आणि 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 2271, वनडे क्रिकेटमध्ये 865 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 987 धावा केल्या आहेत. दुखापतीमुळे त्याने अनेक महत्वाच्या मालिकांमध्ये खेळण्याची संधी गमावली. आयपीएल 2023 मध्येही तो खेळू शकला नाही. वनडे विश्वचषक 2023 मध्ये पंत खेळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, वनडे विश्वचषकातही तो खेळू शकणार नाहीये. (Rishabh Pant has resumed batting practice.)

महत्वाच्या बातम्या –
दिग्गजाने काढली एमएस धोनीची आठवण, मालिका गमावल्यानंतर हार्दिकच्या मताशी असहमत
Asia Cup 2023 । रवी शास्त्री, संदीप पाटील आणि एमएसके प्रसादांनी निवडला भारतीय संघ, वरिष्ठांकडे दुर्लक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---