भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याची नवीन सोशल मीडिया पोस्ट चांगलाच व्हायरल होत आहे. पंत मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीमुळे भारतीय संघासाठी खेळला नाहीये. अशातच आघामी आशिया चषक आणि वनडे विश्वचषकापूर्वी त्याने ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांची चांगलीच चर्चा होत आहे.
मागच्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात पंतची गाडी जळून खाक झाली आणि यष्टीरक्षक फलंदाज सुदैवाने बचावला. पंत गाडी पेट घेण्याआधीच त्यातून बाहेर पडला होता. मात्र, त्याच्या पूर्ण शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या होत्या. स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळे पंतला वेळेत उपचार मिळाले. पंतची दुखापत गंभीर असली तरी, मागच्या आठ महिन्यांमध्ये त्याने अपेक्षेपेक्षा चांगली फिटनेस मिळवली आहे.
संघातून बाहेर असला, तरी रिषभ पंत आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून चाहत्यांच्या सतत संपर्कात आहेत. त्याने अपघातानंतर आपल्या फिटनेसमध्ये होणारी प्रत्येक सुधारणा सोशल मीडियावरून शेअर केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने शेअर केलेल्या नव्या व्हिडिओत सायकलिंग करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “ग्रिप, ट्विस्ट, पेडल. ओनली गुड वाईब्स.” पंतच्या या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. कमेंट्स करणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नर (David Warner) याचाही समावेश आहे. वॉर्नरने लिहिले आहे, “यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू आले आहे. खूप आनंदी आहे.”
https://www.instagram.com/reel/Cwezh0hN8F3/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
रिषभ पंत आणि डेविड वॉर्नर इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळतात. पंत दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार होता. पण दुखापतीमुळे त्याला आयपीएल 2023 खेळता आली नव्हती. त्याच्या अनुपस्थितीत वॉर्रने दिल्लीचे कर्णधारपद सांभाळले होते. आगामी हंगामात देखील पंतच्या उपस्थितीबाबत खात्री देता येत नाहीये. (Rishabh Pant has shared a video of cycling and David Warner’s comment is in discussion)
महत्वाच्या बातम्या –
‘मला वाटले म्हणून काहीही करता येत नाही’, चहलसारख्या खेळाडूंचा प्रश्न विचारताच कर्णधार रोहित स्पष्ट उत्तर
‘भारतातील विश्वचषक भारताने जिंकावा…’, दिग्गज महिला खेलाडूची मोठी प्रतिक्रिया