भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या रिषभ पंतचा जलवा इंग्लंडविरुद्ध होत असलेल्या कसोटी मालिकेतही दिसून येत आहे. पंतने या मालिकेत देखील आपल्या फलंदाजी आणि यष्टिरक्षनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात यष्टिरक्षण करत असताना पंतने असे काहीतरी केले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रिषभ पंतच्या यष्टिरक्षणावर अनेक दिग्गजांनी टीका केली होती. परंतु आता तो उत्कृष्ट कामगिरी करून त्या टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. सोबतच तो आपल्या यष्टीमागील कृत्याने दर्शकांचे मनोरंजनही करताना दिसतो. त्याने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यष्टिरक्षण करत असताना अतिशय मजेशीर कृत्य केले.
आर अश्विन गोलंदाजी करत होता. अश्विनने टाकलेल्या चेंडूवर इंग्लंडचा खेळाडू जॅक लीचने शॉट मारला आणि धाव घेण्याचा विचार केला. इतक्यात यष्टीमागे असलेल्या पंतने आगळावेगळा आवाज काढायला सुरुवात केली. त्यामुळे लीच घाबरला आणि गोंधळून त्याने धाव घेण्यापासून माघार घेतली.
पंतचा हा गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पंतचा आवाज ऐकून लीचने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला नाही, याचा सोशल मीडियावर चांगलाच हशा पिकला आहे.
https://twitter.com/Spiderverse17/status/1364544596659765250?s=20
https://www.instagram.com/p/CLrq2sNBewU/?utm_source=ig_web_button_share_sheet
या सामन्यात इंग्लंड संघाने पहिल्या डावात अवघ्या ११२ धावा केल्या आहेत. तसेच पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाला ३ बाद ९९ धावा करण्यात यश आले आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करतांना कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळत असलेल्या ईशांत शर्माने पहिला गडी बाद केला. त्यांनतर आर अश्विन याने ३ शिकार केले तर अक्षर पटेल याने सर्वाधिक ६ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…
“पुजाराने द्विशतक झळकावत टीम इंडियाला तिसरी कसोटी जिंकून द्यावी,” गृहमंत्रींनी व्यक्त केली इच्छा
आयपीएल २०२१ पुर्वी देवदत्त पड्डीकलची वादळी खेळी, १४ चौकारांसह चोपल्या तब्बल १५२ धावा