भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणारा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरु होण्यास आठवडाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. १८ ते २२ जून दरम्यान खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघाने आपली अंतिम तयारी सुरू केलेली दिसून येते. त्यादृष्टीने भारतीय संघ एजबॅस्टन येथे इंट्रा स्कॉड मॅच खेळत आहे. या सामन्यात युवा सलामीवीर शुबमन गिल व यष्टीरक्षक रिषभ पंत यांनी दमदार कामगिरी करत भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी शुभसंकेत दिले.
कोहली एकादश विरुद्ध राहुल एकादश असा सामना
कोरोनामुळे भारतीय संघ या ऐतिहासिक सामन्यापूर्वी कोणत्याही इतर संघाविरुद्ध सराव सामना खेळू शकत नाही. यावर उपाय म्हणून आपापसात दोन गट बनवून सराव सामना भारतीय संघ खेळत आहेत. यातील एका संघाचा कर्णधार विराट कोहली तर दुसरा संघाचा कर्णधार केएल राहुल याला बनवण्यात आले आहे.
How many of you guessed it right?#TeamIndia pic.twitter.com/7uXkaYaZ3g
— BCCI (@BCCI) June 12, 2021
सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी विराट कोहलीच्या संघाने फलंदाजी करण्याचा मनमुराद आनंद लुटला. या संघात रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा, कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे व यष्टीरक्षक रिषभ पंत यांचा समावेश आहे. तर विरुद्ध संघात सर्व प्रमुख गोलंदाज म्हणजे ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन व मोहम्मद सिराज यांचा समावेश असलेला दिसून येतो.
It's Day 2 of the intra-squad match simulation.
After @RealShubmanGill got a steady start with 85 off 135 deliveries, @RishabhPant17 found his groove with a 121* off 94 deliveries.@ImIshant leads the pack with 3/36 #TeamIndia pic.twitter.com/YRNsVjweDt
— BCCI (@BCCI) June 12, 2021
गिल आणि रिषभची अप्रतिम फलंदाजी
विराट कोहलीच्या संघाकडून खेळताना युवा सलामीवीर शुबमन गिलने १३५ चेंडूत ८५ धावा काढल्या. त्याने दिलेल्या दमदार सुरुवातीनंतर यष्टीरक्षक रिषभ पंतने अवघ्या ९४ चेंडूत नाबाद १२१ धावांची धडाकेबाज खेळी केली. राहुल एकादशकडून अनुभवी इशांत शर्माने ३६ धावा देऊन ३ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता? शून्यावर बाद होऊनही ‘या’ खेळाडूला प्रेक्षकांनी दिली होती मानवंदना
फ्रेंच ओपन २०२१: बार्बरा क्रेचीकोवाने लाल मातीवर रचला इतिहास, पटकावले पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद
अमेरिकन टी२० लीगमध्ये खेळणार जगातील सगळ्यात वजनदार क्रिकेटपटू, ११ भारतीय खेळाडूही होणार सहभागी