---Advertisement---

पेटूराम रिषभ पंत सोशल मीडियावर होतोय ट्रोल, कमेंट पाहून तुम्हालाही फुटेल हसू

On: शुक्रवार, ऑक्टोबर 16, 2020 5:35 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दुखापतीमुळे काही दिवसांपासून संघाबाहेर बसला आहे. असे असले तरी, त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. पंतच्या वाढत्या वजनामुळे ट्रोलर्सनी त्याला निशाण्यावर धरले आहे.

झाले असे की, बुधवारी (१४ ऑक्टोबर) दिल्ली विरुद्ध राजस्थान संघातील सामना होण्याआधी पंत फिटनेस टेस्ट देण्यासाठी मैदानावर आला होता. त्यावेळचा व्हिडिओ इंडियन प्रीमियर लीगने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाइउंटवर पोस्ट केला. त्या व्हिडिओत दिल्ली संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट आणि संघाचा दूसरा एक स्टाफ कर्मचारी मिळून पंतच्या फिटनेसची पाहणी करताना दिसत आहेत. आयपीएलने शेअर केलेल्या त्या व्हिडिओनंतर चाहत्यांनी पंतला ट्रोल करायला सुरुवात केली.

एका चाहत्याने कमेंट करत पंतच्या पोटावर थोडी चरबी वाढलेली दिसत आहे, असे लिहिले. तर एका चाहत्याने या काकांना क्रिकेट खेळायची संधीच कशी मिळाली, अशी मजेशीर कमेंट केली आहे.

https://twitter.com/IPL/status/1316365975055261696?s=20

https://twitter.com/peeyush745/status/1316371836028874752?s=20

https://twitter.com/zamm_alph/status/1316367708208857088?s=20

https://twitter.com/wall_ee_ee/status/1316366993545592832?s=20

https://twitter.com/ReghuramIyer/status/1316385737755955203?s=20

https://twitter.com/REAL_IK16/status/1316368314470289419?s=20

https://twitter.com/ayushd01/status/1316382225135329280?s=20

https://twitter.com/thenabilmohd/status/1316385763961962498?s=20

 

२३ वर्षीय पंत २०१६ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. आतापर्यंत त्याने एकूण ६० सामने खेळत ३६.०८च्या सरासरीने १९१२ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

कर्णधारांचा दे धक्का! कार्तिकने सोडली कॅप्टन्सी; तर ‘या’ खेळाडूलाही नको आहे नेतृत्त्व?

मोठी बातमी! दिनेश कार्तिक कर्णधारपदावरुन पायउतार; मॉर्गन कोलकाताचा नवा कर्णधार

व्हिडिओ : ‘नाश्त्यात नशीब खाऊन आला आहात’ स्वतःच्याच फलंदाजीवर क्रिकेटपटूने केले समालोचन

ट्रेंडिंग लेख-

आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण

IPL 2020 : अफाट कौशल्याने परिपूर्ण असलेले ४ खेळाडू, ज्यांना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी

यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---