Rishabh Pant To Join CSK: आयपीएल 2024 (IPL 2024) संपून केवळ दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. असे असले तरी आयपीएल फ्रँचाईजी पुढील वर्षाच्या तयारीला लागलेल्या दिसून येतात. नुकतेच दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने आपला मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याला पदावरून मुक्त केले. त्यानंतर आता दिल्ली संघाबाबतच एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी हंगामापूर्वी ते आपला कर्णधार रिषभ पंत (Rishah Pant) याला देखील रिलीज करू शकतात.
दिल्ली कॅपिटल्सने काही दिवसांपूर्वीच पाँटिंग याला पदावरून दूर केले. त्याच्याजागी एका भारतीय प्रशिक्षकाला आणण्याची योजना असल्याचे संघाचे मेंटर सौरव गांगुली यांनी सांगितले. मात्र, यासोबतच कर्णधार पंत हा देखील दिल्ली संघाशी फारकत घेणार असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये दिसून येत आहे. तसेच, पुढील हंगामात तो चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग देखील होऊ शकतो असे सांगितले जातेय.
पंत 2016 पासून दिल्ली संघाचा सदस्य आहे. त्याला 2021 मध्ये श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, 2022 च्या अखेरीस तो अपघातात जखमी झाल्यामुळे 2023 मध्ये डेव्हिड वॉर्नरने संघाचे नेतृत्व केले. तर, यावर्षी त्याने पुनरागमन करत पुन्हा एकदा संघाचे कर्णधारपद सांभाळले. मात्र, तरी देखील दिल्ली संघ प्ले ऑफ्समध्ये पोहोचू शकला नाही.
याच कारणांमुळे दिल्ली संघ व्यवस्थापन त्याला रिलीज करू शकते. चेन्नई संघाची तो जोडला जाण्याची शक्यता तशी धूसर दिसून येते. कारण, आयपीएल 2025 पूर्वी खेळाडूंचे मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामध्ये इतर संघ देखील त्याच्यावर बोली लावू शकतात. त्यामुळे तो चेन्नई संघात सामील होईल याची शाश्वती दिसत नाही.
दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आगामी हंगामापूर्वी निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या जागी तशाच पद्धतीचा खेळाडू उपलब्ध झाल्यास, चेन्नई संघाची ताकद वाढेल.
महत्वाच्या बातम्या-
आंद्रे रसलची एक चेंडू आणि ट्रेव्हिस हेडच्या बॅटचे दोन तुकडे, बॅट्समनचे रियाक्शन पाहण्यासारखे!
“रोहित शर्मा खूश नव्हता…”, आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या वादावरून दिग्गज गोलंदाजाचा मोठा दावा
हार्दिक पांड्याची श्रीलंका दौऱ्यातून माघार, या फॉरमॅटमध्ये खेळणार नाही! आता कोण होणार कर्णधार?