---Advertisement---

रिषभ पंतचा कहर! स्मिथला मागे टाकत ‘या’ यादीमध्ये आला दुसऱ्या स्थानी

On: शुक्रवार, मार्च 5, 2021 7:33 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. इंग्लंडला पहिल्या दिवशी २०५ धावांवर बाद केल्यानंतर भारतीय संघ आपल्या पहिल्या डावात काहीसा अडचणीत सापडला होता. मात्र, त्यानंतर यष्टीरक्षक रिषभ पंतने एक जबाबदारीपूर्ण खेळी करत कारकीर्दीतील तिसरे शतक झळकावले. या शतकासोबत त्याने फलंदाजांच्या एका विशिष्ट यादीत दुसरे स्थान पटकावले.

रिषभने झळकावले शतक

दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राच्या अखेरीस भारतीय संघाने ८० धावांवर चार प्रमुख फलंदाज गमावले होते. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रिषभने सुरुवातीला रोहित शर्मासोबत ४१ तर, सातव्या गड्यासाठी वॉशिंग्टन सुंदरसोबत ११३ धावांची भागीदारी करत त्याने भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले.

रिषभने आपल्या कारकिर्दीतील तिसरे कसोटी शतक या डावात पूर्ण केले. रिषभने ११८ चेंडूंचा सामना करताना १०१ धावांची खेळी केली. ज्यामध्ये १३ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. त्याचे हे माय देशातील पहिलेच शतक आहे. रिषभने आपली पहिली दोन कसोटी शतके भारताबाहेर म्हणजे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ठोकली होती.

पाचव्या किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा

रिषभ पंतने या शतकादरम्यान पाचव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना पहिल्या २० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये दुसरे स्थान पटकावले. आपला २० वा कसोटी सामना खेळत असलेल्या पंतने पहिल्या डावापर्यंत १३५८ धावा केल्या आहेत.

या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू कॉलीन ब्लांड आहेत. त्यांनी, आपल्या पहिल्या २० कसोटीमध्ये १४५० धावा बनविल्या होत्या. ब्लांड व पंत यांच्यानंतर या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ व श्रीलंकेचा दिनेश चंडीमल यांचा क्रमांक लागतो. या दोघांनी अनुक्रमे १३५६ व १३२९ धावा बनविल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा पंत दुसराच यष्टीरक्षक, अव्वलस्थानी ‘हा’ दिग्गज

‘IPLचा हिशोब कसोटीत पूर्ण करतायत,’ रोहितला बाद देणं पंचांना पडलं महागात; झाले ट्रोल

अबब! कसोटीत सहाशे विकेट घेणाऱ्या दिग्गज अँडरसनला रिव्हर्स स्वीप मारणारा पंत पहिलाच, पाहा व्हिडीओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---