सोशल मीडियावर क्रिकेटपटूंना ट्रोल करणारे अनेक अकाऊंट्स ऍक्टिव्ह असतात. अशाच एका इंस्टाग्राम अकांउंटवरुन भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला एक व्हिडिओ टाकून ट्रोल करण्यात आले होते.
या व्हिडिओमध्ये नेहमी वेगाने यष्टीचीत करण्यासाठी ओळखला जाणाऱ्या धोनीकडून फलंदाजाला यष्टीचीत करण्याच्या काही संधी सुटल्याचे दिसत आहे. तसेच हा व्हिडिओ आयपीलदरम्यानचा असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे या पोस्टला भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने लाईक केले आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे. त्यातच मागील काही महिन्यांमध्ये रिषभ त्याच्या खराब कामगिरीमुळे टिकेचा धनी ठरला होता. त्यातच त्याने ही पोस्ट लाईक केल्याने धोनीच्या चाहत्यांच्या पचनी न पडण्याची शक्यता जास्त आहे.
पण असे असले तरी पंत आणि धोनीमध्ये मैदानाबाहेरही चांगली मैत्री असल्याचे अनेकदा दिसले आहे. अनेकदा धोनी पंतला मदत करत असल्याचेही पंतने अनेकदा सांगितले होते.
सध्या पंत भारतीय संघात स्थान पक्के करण्यासाठी संघर्ष करत आहे. भारतीय संघाने मर्यादीत षटकांच्या मागील काही क्रिकेट सामन्यांसाठी केएल राहुलला रिषभ पंत ऐवजी यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली होती. तर कसोटीमध्ये पंतसह वृद्धिमान साहा हा देखील यष्टीरक्षक म्हणून पर्याय भारताकडे आहे.
त्याचबरोबर भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी मागील एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. तो शेवटचा २०१९ च्या विश्वचषकात खेळला आहे. त्यामुळे सध्या क्रिकेटवर्तुळात सातत्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चा होत असतात.
ट्रेंडिंग घडामोडी –
आता एबी-विराट खेळणार कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्त्वाखाली
केदार कधीच नाही खेळू शकत कसोटी, भज्जी- रोहितने सांगितले कारण
रोहित शर्मा म्हणतो, कमीतकमी २ विश्वचषक नक्की जिंकू