सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरू झाला आहे. यातील पहिल्या डावात भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब राहिली होती. मात्र दुसर्या डावात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने या डावात अर्धशतकी खेळी केली. याबरोबरत पंतने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
पंतने भारतीय संघाचा यष्टीरक्षक म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये १५०० धावांचा टप्पा पार केला आहे. यासह पंतने एक विक्रम आपल्या नावे केला तो म्हणजे भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करणारा पंत चौथा यष्टीरक्षक फलंदाज ठरला.
यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावे आहे. धोनीने आतापर्यंत ४८७६ धावा केल्या आहेत. त्यानंतर सईद किरमानी यांनी २७५९ धावा केल्या आहे. त्यापाठोपाठ २६११ धावांसह फारुख इंजिनियर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर सध्याचा भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतने १५४९ धावांसह चौथा क्रमांक गाठला. यानंतर नयन मोंगिया १४४२ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
दरम्यान चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघ ९९ धावांनी पिछाडीवर पडला होता. मात्र दुसऱ्या डावात भारताचे सलामीचे फलंदाज केएल राहुल (४६) आणि रोहित शर्मा ८३ धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्माने १२७ धावांची शतकी खेळी केली. पुजाराने देखील ६१ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तसेच रिषभ पंतने ५० धावांची, तर शार्दुल ठाकुरने ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताने दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान ठेवले.
महत्वाच्या बातम्या –
–टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना लागू शकते लॉटरी; एकाकडे तर गोलंदाजीचा दांडगा अनुभव
–विराट मैदानात उतरला म्हणजे विक्रम ठरलेलाच! एकाच खेळीत दोन मोठे विक्रमांसह दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
–“शिकणे अशी प्रक्रिया, जी कधीच संपत नाही”, सचिनसह अनेक आजी-माजी दिग्गजांनी दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा






