---Advertisement---

IND vs AUS: जडेजा तर बाहेर गेला, पंतचे काय? ‘ही’ आहे मोठी अपडेट

On: रविवार, जानेवारी 10, 2021 10:28 AM
---Advertisement---

दुखापतीचे ग्रहण मानगुटीवर बसलेल्या भारतीय संघासाठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या तिसऱ्या कसोटीत आधीच भारत बॅकफूटवर असताना रविंद्र जडेजा आणि रिषभ पंत शनिवारी (०९ जानेवारी) दुखापतग्रस्त झाले होते. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंना स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अष्टपैलू जडेजाचा डावा अंगठा फ्रॅक्चर झाल्याने तो उरलेला सामना आणि उर्वरित मालिकेतून बाहेर पडला. मात्र यष्टीरक्षक फलंदाज पंत दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी सज्ज झाल्याचे समजत आहे.

सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव चालू असताना पंतला दुखापत झाली होती. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी माघारी परतल्यानंतर पंत चेतेश्वर पुजारासोबत मिळून डावाला चालना देत होता. ही जोडी तोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने पॅट कमिन्सने अस्त्र वापरले.

पंत ३४ धावांवर खेळत असताना त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला वेगवान गोलंदाज कमिन्सने १४१ ताशी किलोमीटर वेगाने टाकलेला चेंडू लागला. त्यामुळे तो वेदनेने कळवळत होता. त्यावेळी लगचेच काहीवेळासाठी भारताचा मेडिकल स्टाफ मैदानावर आला होता. पण पंतने उपचार घेतल्यानंतर खेळणे कायम ठेवले. परंतु, तो काहीवेळातच ३६ धावांवर बाद झाला.

त्यानंतर भारताचा डाव २४४ धावांवर संपल्यानंतर त्याला स्कॅनसाठी घेऊन जाण्यात आले असल्याची माहिती बीसीसीआयने ट्विटरवरुन दिली होती. त्याच्याजागी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा सबटिट्यूट यष्टीरक्षक म्हणून ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात खेळला. आता अशी माहिती पुढे येत आहे की, पंतची दुखापत जास्त गंभीर नाही. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानावर उतरु शकतो.

जडेजाच्या रुपात भारतीय संघाला मोठा धक्का

सिडनी कसोटीतील भारताच्या पहिल्या डावात जडेजाला फलंदाजीदरम्यान डाव्या अंगठ्याला मिशेल स्टार्कने टाकलेला बाऊंसर लागला होता. पण तरीही त्याने फलंदाजी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात उतरला नाही. त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले होते. जडेजाच्या ऐवजी मयंक अगरवालने दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण केले.

मात्र स्कॅननंतर जडेजाचा अंगठा फ्रॅक्चर असल्याचे निदान झाल्याने प्राप्त माहितीनुसार तो पुढील सहा आठवडे मैदानावर उपलब्ध राहु शकणार नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आणि पुढील चौथ्या कसोटीसाठी देखील रविंद्र जडेजा खेळणार नाही, हे जवळपास ठरल्यात जमा आहे. मात्र, बीसीसीआयकडून त खेळणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

भारताचे दुखापतग्रस्त खेळाडू –

चालू ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंत आणि जडेजा दुखापतग्रस्त होणारे पहिले भारतीय खेळाडू नाहीत. त्यांच्याआधी मोहम्मद शमी, उमेश यादव आणि केएल राहुल हे तिघेही दुखापतीमुळे या दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहे. शमीला पहिल्या कसोटीत, उमेशला दुसऱ्या कसोटीत दुखापत झाली. तर केएल राहुलला सरावादरम्यान दुखापत झाली.

महत्त्वाच्या बातम्या-

IND v AUS Live : बुमराहने घेतली ग्रीनची विकेट; दुसऱ्या सत्राखेर ऑस्ट्रेलियाकडे ४०६ धावांची आघाडी

सिडनी कसोटीत स्मिथच्या फलंदाजीचा बोलबाला, खोऱ्याने धावा काढत ‘या’ यादीत घेतली टॉप-१० मध्ये उडी

“उर्वरित सामन्यात आम्हाला जडेजाची उणीव भासेल”, पुजाराने दिली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---