दिल्ली। आज दिल्ली डेयरडविल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात फिरोज शहा कोटला स्टेडियमवर साखळी फेरीतील शेवटचा सामना सुरू आहे.
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईसमोर विजयासाठी 175 धावांचे आव्हान ठेवले आहे.
या अर्धशतकाबरोबरच त्याने यष्टीरक्षक म्हणून मोठा विक्रम केला आहे. त्याने यावर्षीच्या आयपीएलमध्ये 14 सामन्यात 52.61 च्या सरासरीने 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 684 धावा केल्या आहेत.
एका आयपीएल मोसमात यष्टीरक्षक म्हणून केलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. याआधी हा विक्रम रॉबिन उथप्पाच्या नावावर होता.
उथप्पाने 2014 च्या आयपीएल मोसमात कोलकता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना 16 सामन्यात 44च्या सरासरीने 660 धावा केल्या होत्या.
त्यावेळी या धावा 2014 च्या आयपीएल मोसमातीलही सर्वाधिक धावा ठरल्या होत्या. तसेच कोलकताने 2014 चे आयपीएल विजेतेपदही मिळवले होते.
भारताचा महान यष्टीरक्षक एमएस धोनीने आत्तापर्यंतच्या आयपीएल मोसमांपैकी 2013 च्या मोसमात सर्वाधिक 461 धावा केल्या आहेत.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
६८४- रिषभ पंत, २०१८
६६०- राॅबीन उथप्पा, २०१४
६५२- केएल राहुल, २०१८
५४८- जाॅश बटलर, २०१८
५१०- दिनेश कार्तिक, २०१३
४९५- अॅडम गिलख्रिस्ट, २००९@MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi @Maha_Sports @BeyondMarathi @kridajagat— Sharad Bodage (@SharadBodage) May 20, 2018
त्याला यावर्षीच्या आयपीएलमध्ये यापेक्षा चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. त्याने यावर्षी आत्तापर्यंत 13 सामन्यात 86 च्या सरासरीने 430 धावा केल्या आहेत.
क्रिकेटप्रेमीं आहात? आमचे हे रविवारचे भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार हे खास सदर नक्की वाचा-
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर
महत्त्वाच्या बातम्या-
–सिंधुला बॅडमिंटनमध्ये दुहेरीत जोडीदार म्हणुन हवा धोनी !
–२० वर्षाच्या रिषभ पंतने आज जे केले ते अनेकांना ११ आयपीएलमध्ये करता आले नाही
–साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी मुंबईकडून एक मोठा बदल
–टी२०मध्ये ५२८ चौकार आणि तेवढ्याच षटकारांची बरसात करणारा तो पहिलाच खेळाडू
–धोनीकडून मिळली किदांबी श्रीकांतला खास भेट!
–राफेल नदालबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?