---Advertisement---

“तेल लगाओ डाबर का, विकेट गिराओ बाबर का”, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी रिषभ पंत काय बोलून गेला?

On: रविवार, जून 9, 2024 10:04 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर संपूर्ण जगाची नजर असते हे सर्वांनाच माहीत आहे. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा सामना पाहण्यासाठी दोन्ही देशांतील लोक सर्व काही सोडून देतात. केवळ भारत आणि पाकिस्तानच नाही, तर इतर अनेक देशांचे क्रिकेट चाहतेही या सामन्यासाठी उत्सुक असतात.

आता रविवार, 9 जून रोजी टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान सामना रंगणार आहे या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यानं “तेल लगाओ डाबर का, विकेट गिराओ बाबर का” या व्हायरल घोषणेवर आपली प्रतिक्रिया दिली.

वास्तविक, टी20 विश्वचषकापूर्वी रिषभ पंतची एक मुलाखत ‘इंडिया टीव्ही’ चॅनलवर रेकॉर्ड झाली होती. ‘आप की अदालत’ या शोमध्ये रजत शर्मा यांनी रिषभ पंतला विचारलं की, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात “तेल लगाओ डाबर का, विकेट गिराओ बाबर का” अशा घोषणा दिल्या जातात. यावर पंतनं हसून उत्तर दिलं.

रिषभ पंत म्हणाला, “आपण एक खेळाडू म्हणून पाहिलं तर ते देखील त्यांच्या देशासाठी खूप मेहनत घेतात. हे एक प्रकारचं बँटर आहे. यातही एक मनोरंजक बाब आहे की सर्वांच्या भावना एकत्र बाहेर येतात. चाहते देखील नवे-नवे नॅरेटिव्ह सेट करतात. जसं की तुम्ही बोलला, ‘तेल लगाओ डाबर का, विकेट गिराओ बाबर का’, या सर्व गोष्टी सामन्याला अधिक रंजक बनवतात.”

 

टी20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत एकूण 7 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारतानं 6 सामने जिंकले असून पाकिस्ताननं फक्त एक सामना जिंकला आहे. 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पराभव झाला होता. त्याच वेळी, 2022 मध्ये टीम इंडियानं शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. त्या सामन्यात विराट कोहली टीम इंडियाचा हिरो होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल नंतरही अभिषेक शर्माचा जलवा जारी! आता अवघ्या 25 चेंडूत ठोकलं शतक
ॲडम झम्पाचा कहर, ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा दम काढला; गतविजेत्यांवर विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका
डेव्हिड मिलरनं दक्षिण आफ्रिकेची लाज राखली, नेदरलँड्सविरुद्ध पुन्हा एकदा होणार होता मोठा अपसेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---