भारतीय क्रिकेट संघाला 19 सप्टेंबरपासून मायदेशात बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी रविवारी रात्री (08 सप्टेंबर) बीसीसीआयने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात यष्टीरक्षक रिषभ पंत यालाही संधी देण्यात आली आहे. पंत 2022 नंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. तत्पूर्वी पंतने कर्णधार रोहितच्या संभाषण शैलीबद्दल मोठे विधान केले आहे.
कर्णधार रोहित हा प्रचंड विसराळू स्वभावाचा आहे ही बाब साऱ्यांनाच माहिती आहे. रोहितच्या या स्वभावाचा चाहत्यांना अनेका प्रत्यय आला आहे. कधी तो पासपोर्ट हॉटेलमध्ये विसरतो, कधी संघात कोण-कोण आहे ती यादी विसरतो, तर कधी शब्दच विसरतो. एकदा विराट कोहलीने खुलासा केला होता की, रोहित बोलताना शब्द विसरतो. मग त्याचे ते विसरलेले शब्द आपल्याला समजून घ्यावे लागतात. तू हे कर, तू ते आण असे रोहित बोलत असतो. त्यामुळे अनेकदा बरेच जण गोंधळात पडतात.
त्याचबाबत तन्मय भटच्या यूट्युब चॅनेवरील चर्चेत रिषभ पंतला विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला, “रोहित भाई शब्द विसरतो हे खरं आहे. त्याला काय म्हणायचं आहे हे समजून घेणं खूप कठीण असतं. मैदानात असेल तर खेळाच्या अनुषंगाने त्याला काय म्हणायचंय याचा अंदाज लावता येतो. मैदानात ठिक आहे पण मैदानाबाहेर मात्र तो काय बोलतो काहीच कळत नाही,” असं स्पष्टपणे पंतने सांगितलं आहे.
पंतने कोहलीला त्रास दिला होता
आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पंतने मैदानाबाहेर विराट कोहलीला त्रास दिला असल्याचा खुलासा केला आहे. बंदीमुळे पंत आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. यावेळी पंत साईटस्क्रीनवरून कोहलीला त्रास देत होता. पंत म्हणाला, “आमच्यासाठी हा मोसमातील सर्वात महत्त्वाचा सामना होता आणि आम्हाला चांगली कामगिरी करायची होती. मी हा सामना खेळू शकलो नव्हतो. मी बाहेरून काय करू शकतो याचा विचार करत होतो.”
हेही वाचा-
कोहली किंवा जो रूट नाही तर ‘हा’ बनेल कसोटीतील सर्वकालीन महान खेळाडू, गांगुलीची भविष्यवाणी
उपकर्णधारापासून ‘द वॉल’पर्यंत, या दिग्गजांसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद!
एमएस धोनीचा वीस वर्षे जुना विक्रम थोडक्यात हुकला; या खेळाडूने केली बरोबरी