भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने 23 जानेवारीपासून सौराष्ट्र विरुद्ध होणाऱ्या पुढील रणजी ट्रॉफी सामन्यासाठी दिल्लीचे नेतृत्व न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीचा संघात समावेश करण्यात आला आहे. परंतु आगामी सामन्यासाठी अंतिम अकरा संघात त्याचा समावेश त्याच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.
सुरुवातीला विराट कोहली आणि रिषभ पंत यांचा देशांतर्गत हंगामासाठी संभाव्य खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला होता. परंतु त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिबद्धतेमुळे ते रणजी ट्राॅफी आणि व्हाईट-बॉल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यासाठी अनुपलब्ध झाले. बीसीसीआयच्या नवीन सूचनांनंतर, आता स्टार खेळाडू देखील आपापल्या देशांतर्गत संघात सामील होत आहेत.
सामन्यापूर्वी रिषभ पंतबद्दल असे म्हटले जात होते की रणजीमध्ये संघात सामील झाल्यानंतर तो कर्णधारपदाची जबाबदारी घेऊ शकतो. परंतु त्याला कर्णधार न बनविल्यानंतर, कर्णधारपद आयुष बदोनीकडेच राहील. त्याने पहिल्या टप्प्यात या स्पर्धेत संघाचे नेतृत्व देखील केले होते. याचा अर्थ रिषभ पंत आता आयुष बदोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल.
RISHABH PANT OPTS OUT OF DELHI RANJI TEAM CAPTAINCY…!!!!
– Rishabh Pant opts out of Captaincy and now Ayush Badoni will lead Delhi team vs Saurashtra in this Ranji Trophy. (Sportstar). pic.twitter.com/9nm91Sb22h
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 17, 2025
स्पोर्ट्स स्टारच्या वृत्तानुसार, पुढील दोन रणजी ट्रॉफी सामन्यांसाठी दिल्ली संघाची घोषणा लवकरच होणार आहे. रिषभ पंतने कर्णधारपदात रस दाखवलेला नाही. त्यामुळे आयुष बदोनीला ही भूमिका स्वीकारण्याची संधी मिळाली आहे. देशांतर्गत स्पर्धेत पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेल्या या यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवडीसाठी स्वतःला उपलब्ध करून दिले आहे.
हेही वाचा-
मनु भाकर- डी गुकेशसह चौघांना खेलरत्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिले क्रीडा पुरस्कार, VIDEO
आयपीएल 2025 पूर्वी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू दुखापती
करुण नायर नाही, या खेळाडूला मिळेल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संधी! कारण जाणून घ्या