भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला पहाटे मोठा अपघात झालेला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला असून, त्याच्यावर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र त्याचवेळी आता त्याच्याबाबत एक आनंदाची बातमी समोर येत येतेय. रिषभ याला अतिदक्षता विभागातून खासगी वॉर्डमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
चार दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये असलेल्या रिषभबाबत एक परिपत्रक जाहीर करत मॅक्स हॉस्पिटलने म्हटले,
‘त्याच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. त्याला आम्ही आता अतिदक्षता विभागातून खासगी वॉर्डमध्ये स्थलांतरित करतोय. त्याच्या पायामध्ये अद्यापही वेदना आहेत. मात्र, सध्या तरी एमआरआय स्कॅन करण्याची काही गरज वाटत नाही.’
आपल्या आईला भेटण्यासाठी रूडकी येथे जात असताना 30 डिसेंबरच्या पहाटे त्याचा अपघात झाला होता. काही स्थानिक व एका बसच्या ड्रायव्हर-कंडक्टरने त्याला वेळीच मदत करत सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले. त्यानंतर त्याला मॅक्स हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. त्याच्या डोक्याला व हाताला थोडा मार लागलेला तर, पाठीवर काही किरकोळ जखमा होत्या. मात्र त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचे लिगामेंट तुटल्याचे सांगण्यात येत आहे.
ही जखम पूर्णपणे बरी होण्यासाठी त्याला चार ते पाच महिन्यांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे रिषभ आता काही काळ क्रिकेटपासून दूरच असेल. या काळात भारतीय संघाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही अतिमहत्त्वाची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यासोबतच तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधारही असून, तो आयपीएलमध्ये ही सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे त्याला पुन्हा लवकर मैदानात पाहण्यासाठी चाहत्यांना वाट पाहावी लागेल.
(Rishabh Pant Accident: Rishabh Out Of ICU Hospital Confirmed)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्याचा बीसीसीआयने केला अपमान तोच बनणार निवडकर्ता; ‘या’ नव्या नावांचीही चर्चा
व्यस्त वेळापत्रकामुळे किवी गोलंदाजाला आले टेंशन, भारत-पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून घेतली माघार