---Advertisement---

‘ट्विटर बंद होण्यापूर्वी उर्वशी रौतेला सोबत फोटो टाक’, रिषभ पंतच्या पोस्टवर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

On: बुधवार, मे 26, 2021 12:50 PM
Rishabh-Pant
---Advertisement---

येत्या काही दिवसातच क्रिकेट रसिकांना अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान, साउथॅम्प्टनच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ १४ दिवस मुंबईच्या हॉटेलमध्ये विलगिकरणात आहे.अशातच रिषभ पंतने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यावर चाहत्यांनी त्याची चांगलीच फिरकी घेतली आहे.

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या २४ सदस्यांच्या भारतीय संघात,रिषभ पंतला ही संधी देण्यात आली आहे. रिषभ पंतने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आणि इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत रिषभ पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

तो या दौऱ्यासाठी कसून सराव करत आहे. अशातच त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर,एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो एकाग्र अवस्थेत दिसून येत आहे. तसेच त्याने या फोटोवर कॅप्शन म्हणून, “आपल्या मनातील आवाज ऐका” असे लिहिले आहे.

या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी चांगलीच खिल्ली उडविली आहे. एका युजरने लिहिले की, “लवकर उर्वशी रौतेला सोबत असलेला फोटो अपलोड कर, ट्विटर बंद होणार आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले की,”मनातून येणारा आवाज, स्पायडरमॅन,स्पायडरमॅन.” अनेकांनी पंतच्या या फोटोची तुलना केएल राहुलशीही केली आहे. अनेकांचे म्हणणे आहे की या फोटोमध्ये पंत केएल राहुलप्रमाणे दिसतो.

https://twitter.com/NikhilK69930695/status/1397113566247878656

https://twitter.com/NemiGulati/status/1397114134882177031

https://twitter.com/wtfbunnyy/status/1397226122396438535

https://twitter.com/slaychau/status/1397113367668527107

काही महिन्यांपूर्वी, रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांची चांगलीच चर्चा रंगली होती. २०१९ मध्ये या दोघांना एकत्र पहिले गेले होते. त्यानंतर दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. ज्यामुळे रिषभने तिला व्हॉट्सॲपवरून ब्लॉक करून टाकले होते, अशी चर्चा होती. असे म्हटले जात आहे की, केंद्राच्या नवीन इंटरमीडिएट मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली जाईल. त्यामुळे युजरने उर्वशी सोबत फोटो शेअर करण्याची मागणी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘उशी कुठंय?’ व्यायामाच्या व्हिडियावर युजरने विचारलेल्या प्रश्नाला ईशांत शर्माचे भन्नाट उत्तर

अप्रतिम!! महिला क्रिकेटची वसीम अक्रम, हवेतच चेंडू स्विंग करत उडवल्या दांड्या

रिषभ पंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक आणि अर्धशतक केव्हा, कुठे आणि कधी केले होते? घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---