---Advertisement---

‘उशी कुठंय?’ व्यायामाच्या व्हिडियावर युजरने विचारलेल्या प्रश्नाला ईशांत शर्माचे भन्नाट उत्तर

On: बुधवार, मे 26, 2021 12:35 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. यासाठी सर्वच खेळाडू सज्ज होत आहेत. सर्व खेळाडू सरावाला देखील लागले आहेत. त्यातच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याने नुकताच व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामला शेअर केला होता. त्यावर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सध्या ईशांत शर्मा भारतीय संघासोबत मुंबईत बायोबबलमध्ये आहे. दरम्यान, त्यांनी हॉटेलच्या रूममध्येच व्यायाम करायला सुरु केले आहे. हा व्हिडिओ त्याने शेअर करत कॅप्शन दिले आहे की ‘शरीर ती गोष्ट मिळवू शकते, ज्यावर मनाचा विश्वास असतो’.

https://www.instagram.com/p/CPIv68pAae5/

ईशांतच्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातील एका युजरच्या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधले, अगदी ईशांतनेही त्याला प्रतिक्रियेवर उत्तर दिले आहे. त्या युजरने प्रतिक्रिया दिली होती की ‘उशी कुठे आहे?’ त्यावर ईशांत म्हणाला की, ‘एका व्यायामाच्या प्रकारात तुम्ही पाहू शकता, फोकस करा’.

Photo Courtesy: Instagram/@ishant.sharma29

दरम्यान भारतीय संघ मुंबईत क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून 2021 दरम्यान साऊथॅम्पटन येथे अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड संघात ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान ५ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अप्रतिम!! महिला क्रिकेटची वसीम अक्रम, हवेतच चेंडू स्विंग करत उडवल्या दांड्या

रिषभ पंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक आणि अर्धशतक केव्हा, कुठे आणि कधी केले होते? घ्या जाणून

श्रीलंकेला पराभूत करत वनडे सुपर लीगच्या क्रमवारीत बांगलादेश अव्वल; तर भारतीय संघ ‘या’ स्थानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---