सुपर-8 मधील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तान विरुद्ध शानदार विजय नोंदवला आहे. या विजयाने भारतीय संघ टी20 विश्वचषक 2024 मधये सलग चार सामने जिंकला आहे. या सामन्यात टीम इंडियाने आपल्या तिन्ही क्षेत्रात म्हणजेच फलंदाजीत, गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणामध्ये चमकादार कामगिरी केली. हा सामना वेस्ट इंडिज येथील बार्बाडोस येथे खेळवला. भारतीय संघाने हा सामना 47 धावंनी आपल्या नावे केला. तर यादरम्यान सुर्याच्या फलंदाजीमुळे त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आले. तर बेस्ट फिल्डर म्हणून संघात चार दावेदार होते. तर यामध्ये सर रव्रींद्र जाडेजाला हा मेडल देण्यात आले.
सामन्यात चार खेळाडूंनी शानदार झेल घेत बेस्ट फिल्डरसाठी नमुना साधर केले. रिषभ पंतने अफगाणिस्तानचा सलामीवीर गुरबाजचा शानदार कॅच घेतला. तर बुमराहच्या गोलंदाजीवर अर्शदीप सिंगने नजीबुल्ला झद्रानचा वेगवान झेल घेतला. अक्षर पटेलने देखील अजमतुल्ला उमरझाईचा झेल घेतला. पण रवींद्र जडेजाने सामन्यात एकूण तीन झेल घेतल्या. त्याने हजरतुल्ला झाझई, मोहम्मद नाबी आणि कर्णधार राशीद खान यांचे महत्वपूर्ण झेल घेतल्या. त्यामुळे हेड कोच राहुल द्रवीड हस्ते रवींद्र जडेजाला बेस्ट फिल्डरचा मेडल देण्यात आले.
Reaction from Rohit & Kohli when Fielding coach invited Dravid to hand over the medal to Jadeja ❤️
– This is more than a team….!!! It’s a family. pic.twitter.com/75zpDRWVrP
— Johns. (@CricCrazyJohns) June 21, 2024
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर रोहित शर्माने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, भारतीय संघाची सुरुवात फारच निराशाजनक झाली. रोहित शर्मा 8 धावाकरुन बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रिषभ पंतने थोडीफार फटकेबाजी करत धावा केल्या. पण राशीद खानने त्याला 20 धावांवर परत पाठवले तर विराट देखील षटकात खेचण्याच्या नादात 24 धावांवर झेलबाद झाला. सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्या भागीदारीने भारताने 181 धावांचे लक्ष्य अफगाणिस्तान समोर ठेवले.
धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघ भारतीय गोलंदाजीच्या अचूक माऱ्यासमोर ढेपाळला. 20 षटकात संघाला 10 गडी गमावून केवळ 134 धावा करता आल्या. भारतीय गोलंदीजत जसप्रीत बुमराह अर्शदीप सिंगने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या तर कुलदीप यादवने 2 तर रवींद्र जडेज आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवल्या.
महत्तवाच्या बातम्या-
काय सांगता! गौतम गंभीरच्या आधी व्हीव्हीएस लक्ष्मण बनणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?
कांगारुंचं बांग्ला टायगरवर वर्चस्व; DLS पद्धतीने मिळवला सहज विजय
क्रिकेट विश्वचषकात मिचेल स्टार्कचा दबदबा! या बाबतीत टाकलं सर्व दिग्गजांना मागे