---Advertisement---

रिषभ पंतला टीम इंडियातून केले रिलिज, आता खेळणार या संघाकडून

On: शनिवार, नोव्हेंबर 23, 2019 11:59 AM
---Advertisement---

कोलकाता। भारत विरुद्ध बांगलादेश संघात कालपासून(22 नोव्हेंबर) इडन गार्डनवर दिवस-रात्र कसोटी सामना सुरु आहे. पण भारतीय निवड समीतीने या सामन्यातून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला मुक्त केले आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेची तयारी म्हणून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी पंतला भारतीय संघातून मुक्त करण्यात आले आहे.

याबद्दल बीसीसीआयच्या एका सुत्राने पीटीआयला सांगितले की ‘रिषभ वेस्ट इंडीज विरुद्ध सर्व सहा सामने (3 टी20 आणि 3 वनडे) खेळणार आहे. त्यामुळे निवड समीतीला वाटते की त्याने दिल्लीकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळणे योग्य राहिल.’

पंतऐवजी दिवस-रात्र कसोटीसाठी यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला पर्याय म्हणून आंध्रप्रदेशचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत भारतीय संघाशी जोडला जाईल.

भरत भारतीय अ संघाचा नियमित सदस्य आहे. तसेच त्याने आत्तापर्यंत 69 प्रथम श्रेणीचे सामने खेळताना 8 शतके आणि 20 अर्धशतकांसह 3909 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका त्रिशतकी खेळीचाही समावेश आहे.

विशाखापट्टणमच्या विमानतळावरून निघत असताना भरतने पीटीआयला सांगितले की ‘मी लखनऊमध्ये 2015 च्या दुलिप ट्रॉफी स्पर्धेत पहिल्यांदा गुलाबी चेंडूने सामना खेळलो होतो.’

तसेच तो पुढे म्हणाला, ‘मला फोन आला आणि मला उद्या सकाळी 8.30 पर्यंत भारतीय संघात सामील होण्यास सांगण्यात आले आहे. मी माझा आदर्श विराट कोहलीसह ड्रेसिंग रुम शेअर करण्यास उत्सुक आहे. वृद्धिमान साहा सध्याचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांपैकी आहे. मी त्याच्याकडून बरेच काही शिकण्यास खूप उत्साही आहे.’

तसेच पंत व्यतिरिक्त शुभमन गिललाही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी मुक्त करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---