---Advertisement---

रोहित शर्मानंतर या दिग्गज खेळाडूने दिला रिषभ पंतला पाठिंबा!

---Advertisement---

रविवारी (10 नोव्हेंबर) नागपूर (Nagpur) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात तिसरा आणि निर्णायक टी20 सामना पार पडला. यामध्ये भारताने  30 धावांनी विजय मिळवला. तसेच, 2-1 ने मालिका आपल्या ताब्यात घेतली.

या मालिकेत रिषभ पंतच्या (Rishabh Pant) खराब कामगिरीमुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. मात्र भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी पंतचे समर्थन केले आहे.

या मालिकेत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणातील खराब कामगिरीमुळे त्याला क्रिकेटच्या चाहत्यांकडून सोशल मिडियावर ट्रोल (Troll) करण्यात आले होते. तसेच, त्याला संघातून बाहेर काढण्याची मागणी करण्यात येत होती.

परंतु, रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) आता माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी रिषभ पंतचे समर्थन केले आहे.

पंतचे समर्थन करत गावस्कर म्हणाले की, यष्टीरक्षकाच्या भूमिकेत काम करणे कठीण असते. त्याची प्रशंसा कोणीही करत नाही. असेच काही पंतबरोबर होत आहे. त्याच्या फलंदाजीवर टीका होत आहेच. परंतु, त्याला अजून संधी मिळाली पाहिजे.

“क्रिकेटमध्ये दोन-तीन थँक्सलेस जाॅब असतात. त्यापैकी एक पंच आहेत. जर, त्यांच्याकडून 10 मधील 9 निर्णय बरोबर असतात. परंतु, 1 निर्णय चूकल्यामुळे चाहते त्यांच्यावर टीका करू लागतात. त्याचप्रकारे, यष्टीरक्षकाबरोबरही असेच काहीसे होते. तो 95% टक्के बरोबर काम करतो. त्यात 5% टक्के चूकीचे असते. त्यामुळे त्याच्यावर टीका केली जाते,” असे गावस्कर म्हणाले.

यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) पंतचे समर्थन केले होते. “प्रत्येक दिवशी, प्रत्येक मिनिटाला रिषभ पंतबद्दल चर्चा केली जात आहे. मला असे वाटते की, मैदानावर त्याला जे काही करायचे आहे ते करू द्यायला पाहिजे. मी प्रत्येकाला विनंती करतो की काही काळासाठी पंतला दुर्लक्षित करा,” असे रोहित म्हणाला होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---