आशिया चषक 2022 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान ही रोमहर्षक लढत रविवारी (28 ऑगस्ट) दुबई क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे रंगणार आहे. या सामन्यासाठी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत जोरदार सराव करत आहे. पंतने शनिवारच्या सराव सत्रात मोठमोठे फटके मारले आणि आपण चांगल्या फॉर्मात असल्याचे संकेत दिले आहेत. पंतने स्वत: त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपला सराव सत्रातील व्हिडिओ शेअर केला आहे.
पंतने (Rishabh Pant) इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत तो एकापाठोपाठ एक चेंडू हवेत (Rishabh Pant Net Session) टोलवताना दिसत आहे. त्याने या सराव सत्रात चांगला फुटवर्क दाखवला आहे. तसेच काही चेंडूंवर त्याने क्रिजवरील सीमारेषेच्या पुढे येऊनही फटके मारले आहेत. इतकेच नव्हे तर, त्याने त्याचा आवडता रिव्हर्स स्वीप फटकाही मारला आहे. मात्र त्याने एका हाताने मारलेल्या षटकाराने (Rishabh Pant One Hand Six) सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पंतने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ऑफिसमध्ये एक चांगला दिवस.’
पंतला सराव सत्रात अशी धडाकेबाज फटकेबाजी करताना पाहून चाहते व्यक्त होत आहेत. एका चाहत्याने प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, ‘बस्स फक्त पाकिस्तानला आता सोडू नकोस.’ तर दुसरा चाहता म्हणाला आहे की, ‘मी तुझ्या एकहाती षटकाराची वाट पाहिल’. तर एका चाहत्याने अतिशय लक्षवेधी प्रतिक्रिया केली आहे. त्याने म्हटले आहे की, ‘भावा असं वाटतंय, तू एका सामन्यात 4 शतके ठोकशील.’
https://www.instagram.com/reel/ChuVCOxp722/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान आयपीएलच्या तुलनेत पंतला आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात प्रभावी प्रदर्शन करता आलेले नाही. पंतने आतापर्यंत भारतीय संघाकडून 54 टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 23.86 च्या सरासरीने 883 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या बॅटमधून फक्त 3 अर्धशतकेही निघाली आहेत. हेच त्याचे आयपीएलमधील प्रदर्शन पाहायचे झाल्यास, त्याने 98 सामने खेळताना 34.61 च्या सरासरीने 2838 धावा फटकावल्या आहेत. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 15 अर्धशतकेही केली आहेत.




