Rishabh Pant Century: लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने अखेर धमाकेदार शतक झळकावले. पण दुर्दैवाने एलएसजीसाठी, स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यातच ते आले कारण फ्रँचायझी आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली होती. गेल्या वर्षी आयपीएल लिलावात 27 कोटी रुपयांना खरेदी झालेल्या पंतने या हंगामात फलंदाजीने फारशी चांगली कामगिरी केली नव्हती पण मंगळवारी (27 मे) एकाना येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध त्याने दमदार शतक झळकावत शानदार स्पायडरमॅन सेलिब्रेशन केले. (Rishabh Pant Century)
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पंतने 54 चेंडूत 10 चौकारांसह गगनचुंबी 6 षटकार ठोकत शतकाला गवसणी घातली दुसऱ्या टोकावरील नेहमीच सातत्यपूर्ण असलेल्या मिशेल मार्शने त्याला योग्य साथ दिली. दरम्यान 20 षटकात लखनऊने 227 धावांचा डोंगर उभारत आरसीबीला जिंकण्यासाठी 228 धावांचे आव्हान दिले. (Rishabh Pant and Mitchell Marsh played a decent partnership)
काही दिवसांपूर्वी पंतने म्हटले होते की हंगामात असे अनेक क्षण आले जेव्हा ते आयपीएल प्लेऑफसाठी पात्र ठरू शकले असते परंतु या संधींचा फायदा घेण्यास असमर्थता संघाला दीर्घकाळात महागात पडली. एलएसजीचा हंगाम खूपच निराशाजनक राहिला आहे परंतु शेवटच्या सामन्यात रिषभ पंतने दम दाखवत धमाकेदार शतक झळकावले. यादरम्यान त्याने हटके सेलिब्रेशन केले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Rishabh Pant scored a brilliant century against RCB)
CELEBRATION OF IPL HISTORY ???? pic.twitter.com/e9sZagkOqd
— Johns. (@CricCrazyJohns) May 27, 2025





