आयपीएल 2021 मधील 13 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवरती सहा गडी राखून विजय मिळवला. परंतु सामन्यादरम्यान दिल्ली संघाकडून यष्टीरक्षण करत असलेला दिल्ली संघाचा कर्णधार रिषभ पंत गोलंदाजी करत असलेल्या ललित यादववर रागवलेला दिसला.
मुंबई इंडियन्सच्या डावाच्या वेळी सुरुवातीला ललित यादव थोडी बिचकत गोलंदाजी करत होता. या सामन्यातील 8 व्या षटकात जेव्हा ललित यादव थोडी सैल गोलंदाजी करत होता, तेव्हा यष्टिमागे यष्टीरक्षण करत असलेल्या पंतने त्याला पाहिले आणि तो ललितवर ओरडलाय “शरीर मोकळे सोड जरा आपले (बॉडी वॉडी खोल रे जरा)” असे तो रागाने म्हणाला.
यानंतर ललितने शानदार गोलंदाजी करत मुंबईचा अष्टपैलू कृणाल पांड्याचा बळी घेवून पुनरागमन केले. त्याने आपल्या 4 षटकांत केवळ 17 धावा खर्च करुन 1 बळी घेतला. त्यानंतर फलंदाजी करतानाही त्याने नाबाद 22 धावा केल्या.
https://twitter.com/All_aboutsport_/status/1384525308859097091?s=20
या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या 44 धावांच्या जोरावर 137 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्ली कॅपिटल संघातील शिखर धवनच्या 45 धांवाच्या जोरावर 19.1 षटकांत हे लक्ष्य अगदी सहज गाठले. तर दिल्लीकडून 4 षटकांत 24 धावा देऊन चार बळी घेतलेल्या अमित मिश्राला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
एकेकाळी महिलेला मारहण केल्याने झाला होता तुरुंगवास, आता आयपीएलमधील दमदार कामगिरीने लुटतोय वाहवा!
बालपणीपासूनचं टॅलेंटेड! विराट दहावीला असतानाचं बनला होता कर्णधार, हे फोटो पाहून पटेल खात्री