टी२० विश्वचषक २०२१ च्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नामिबियावर ९ गडी राखून विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने ८ गडी गमावून १३२ धावा केल्या होत्या. भारताने फक्त १ गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. या सामन्यात रिषभ पंतला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण क्षेत्ररक्षणादरम्यान त्याने केलेल्या एका कृत्याने, करोडो क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरेतर, नामिबियाचा फलंदाज निकोल ईटनने एक धाव पूर्ण करण्यासाठी डायव्ह मारला आणि त्याची बॅट यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या पायाला लागली. रिषभ त्याला धावबाद करण्यासाठी स्टंपजवळ उभा होता. यानंतर पंतने हृदय जिंकणारी कृती केली. त्याने आधी बॅटला हाताने स्पर्श केला आणि नंतर आदर दाखवण्यासाठी हात छातीवर घेतला. पंतची ही भावना क्रिकेट चाहत्यांना आवडली. क्रिकेटची बॅट त्याच्यासाठी किती पवित्र आहे आणि तिचा अनादर होता कामा नये, हे पंतने या माध्यमातून दाखवून दिले.
Rishabh pant nd his Respect Towards BAT 🔥 #INDvNAM pic.twitter.com/Zc4kXt70yT
— Manizzz (@Manizzz_45) November 8, 2021
Rishabh Pant's respect towards the bat ✨ pic.twitter.com/1XwzXgVbal
— Riddhima (@Riddhimumma) November 8, 2021
दरम्यान, नामिबियाने २० षटकात ८ विकेट गमावून १३२ धावा केल्या होत्या. भारताने १५.२ षटकात १ गडी गमावून १३३ धावांचे लक्ष्य गाठले. रोहित शर्माने ५६ धावांची शानदार खेळी खेळली आणि केएल राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारीही केली. राहुलने विजयी चौकार लगावला आणि ३६ चेंडूत ५४ धावा करून नाबाद परतला. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजानेही ३-३ बळी घेतले. रवींद्र जडेजा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर स्कॉटलंड, अफगाणिस्तान आणि नामिबियाला पराभूत करून भारताने आपली टी२० विश्वचषक मोहीम पूर्ण केली. या टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल होणार आहे. विराट कोहलीने आपले कर्णधारपद सोडले आहे तर राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्मा का होऊ शकतो भारताच्या टी२० संघाचा उत्तम कर्णधार, ‘ही’ आहेत ३ महत्त्वाची कारणं
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद, तर शॉ, पड्डीकललाही संधी