---Advertisement---

तो पंत आहे काहीही करू शकतो! सराव करताना देखील आपल्याच संघसहकाऱ्याला करतोय स्लेजिंग, पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, एप्रिल 9, 2021 9:10 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा नेहमीच आपल्या मजेशीर कृत्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून असतो. यंदा तो श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ आपला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध १० एप्रिलला खेळणार आहे. या सामन्यापूर्वी रिषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रिषभ पंतने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उल्लेखनीय कामगिरी केली होती. यासोबतच तो अनेकदा यष्टीमागे उभा राहून विरोधी फलंदाजांची पायखेची करताना दिसून आला होता. नुकताच दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रिषभ पंत नेट्समध्ये यष्टीरक्षण करताना दिसून येत आहे. तर सॅम बिलींग्स फलंदाजी करत आहे. यावेळी रिषभ पंत त्याला स्लेजिंक करण्यापासून आवरू शकला नाहीये.

या व्हिडिओमध्ये रिषभ पंत आणि सॅम बिलिंग्स एकमेकांसोबत संवाद साधताना दिसून येत आहे. सॅम बिलिंग्स त्याला म्हणतो की, “भारतात आपले स्वागत आहे.” मग रिषभ पंत त्याला म्हणतो की, “कसोटीपेक्षा बरे आहे ना.”

यानंतर जेव्हा बिलिंग्सला खेळताना अडचण येत असते तेव्हा रिषभ पंत त्याची स्लेजिंग करताना म्हणतो की, “कोणाला तरी हिट करण्यास त्रास होतो आहे.” या व्हिडिओला दिल्ली संघाने कॅप्शन देत लिहिले आहे की,” रिषभ पंत यष्टीचा मागे स्वतः ला स्लेजिंग करण्यापासून थांबवू शकत नाही मग तो सराव सत्र असला तरीही.”

https://twitter.com/DelhiCapitals/status/1380100469800927232

यंदा रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आयपीएल २०२० स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, या हंगामाआधी श्रेयस दुखापतग्रस्त झाला. नुकतीच त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या दुखापतीमुळे तो यंदाच्या आयपीएल हंगामाला मुकणार आहे. त्यामुळे या हंगामात रिषभ पंत कर्णधाराच्या रुपात दिसणार आहे. आता त्याच्या नेतृत्वात दिल्ली संघ कशी कामगिरी करतो, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

दिल्ली कॅपिटल्सला दिलासा! चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीपुर्वी दिग्गज खेळाडूंनी सुरू केला सराव

ख्रिस लिनचे अर्धशतक एका धावेने हुकले, मुंबईच्या १३ षटकांनंतर ३ बाद १०५ धावा

रॉबिन उथप्पाला मिळाला ‘नॅशनल एक्सलन्स अवार्ड’, जाणून घ्या त्या पुरस्काराबद्दल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---