भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या मालिकेत,युवा यष्टीरक्षक रिषभ पंत याला कसोटी, वनडे आणि टी -२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. या संधीचा फायदा घेत त्याने चौफेर फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. याचे फळ त्याला अगदी एक आठवड्यातच मिळाले आहे. येणाऱ्या आयपीएल हंगामात दुखापतग्रस्त श्रेयस अय्यर ऐवजी दिल्लीचे सूत्र सांभाळण्याची जबाबदारी रिषभ पंत याला देण्यात आली आहे. ही गोड बातमी ऐकल्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरला क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला ४ ते ५ महिने मैदानाबाहेर बाहेर राहावे लागणार आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता की, आगामी हंगामासाठी दिल्ली संघाचे नेतृत्व कोण करेल? यावर तोडगा काढत त्यांनी मंगळवारी ,(३० मार्च) रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करेल असेल म्हटले आहे.
ही आनंदाची बातमी कळताच रिषभ पंतने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला,” दिल्ली अशी जागा आहे जिथे मी लहानाचा मोठा झालो आहे. ६ वर्षांपूर्वी मी याच संघातून आपली आयपीएलची कारकीर्द सुरू केली होती. या संघाचे नेतृत्व करणे माझे स्वप्नं होते आणि हे स्वप्न आज सत्यात उतरले आहे. मी संघ मालकांचे आभार मानतो की, त्यांनी मला या भूमिकेसाठी पात्र समजले. उत्कृष्ट प्रशिक्षक स्टाफ आणि वरिष्ठ खेळाडू यांच्यासोबत मिळून मी दिल्ली कॅपिटल्स संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.”
श्रेयस अय्यरने दिल्या शुभेच्छा
इंग्लंड संघाविरुद्ध वनडे मालिका खेळत असताना पहिल्या सामन्यातून दुखापतीमुळे संघाबाहेर झालेला श्रेयस अय्यर आयपीएल स्पर्धेला देखील मुकणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रीया देत श्रेयस अय्यर म्हणाला,” जेव्हा मला खांद्याला दुखापत झाली होती तेव्हा दिल्ली संघासाठी एका लिडरची आवश्यकता होती. मला याबाबत काहीच शंका नाही की, रिषभ पंत यासाठी एकदम योग्य आहे. मी त्याला शुभेच्छा देतो की तो या संघासोबत उत्कृष्ट कामगिरी करेल. मला या संघाची आठवण येईल पण मी संघाचा उत्साह वाढवत राहील.”
हेही वाचा-
–क्रिकेट ऑस्ट्रेलियातील या दिग्गज व्यक्तीने स्टिव स्मिथला पुन्हा कर्णधार करण्यास दिलाय नकार
–क्रिकेट ऑस्ट्रेलियातील या दिग्गज व्यक्तीने स्टिव स्मिथला पुन्हा कर्णधार करण्यास दिलाय नकार
–जंटलमन हॅश- दारुच्या ब्रँडचा लोगो जर्सीवर न लावल्यामुळे लाखो रुपये गमावलेल्या हशिम आमलाची गोष्ट
–क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! चार एप्रिल रोजी बांगलादेशात होणार भारत-पाकिस्तान संघात क्रिकेटचा थरार