भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (१२ जून) कटकच्या बाराबती स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारतीय संघाला ४ विकेट्सने पराभव पाहावा लागला. हा त्यांचा टी२० मालिकेतील सलग दुसरा पराभव होता. या पराभवानंतर भारतीय संघाचा प्रभावी कर्णधार रिषभ पंत याने त्यामागचे कारण सांगितले आहे.
गोलंदाजांवर फोडले पराभवाचे खापर
सामन्यानंतर पंत (Rishabh Pant) म्हणाला की, “फलंदाजीत आम्ही १०-१५ धावा कमी केल्या. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि इतर वेगवान गोलंदाजांनी पहिल्या ७-८ षटकात शानदार गोलंदाजी केली. परंतु त्यानंतर आम्ही विकेट्स घेऊ शकलो नाहीत. मधल्या षटकात (No Wicket In Middle Overs) आम्ही विकेट्स घ्यायला पाहिजे होत्या. परंतु आम्ही तसे करू शकलो नाही.”
“जर आम्ही मधल्या षटकात विकेट्स घेतल्या असत्या, तर तिथेच आम्ही सामना जिंकलो असतो. परंतु आमच्या फिरकीपटूंनी (Spinners Poor Performance) सामन्यात खूपच खराब प्रदर्शन केले,” असेही पंत म्हणाला. पंतच्या म्हणण्याप्रमाणे या सामन्यात फिरकीपटू युझवेंद्र चहलने ४ षटके फेकताना ४९ धावा खर्च केल्या आणि केवळ एकच विकेट घेतली. तसेच अक्षर पटेलनेही एका षटकात १९ धावा खर्च केल्या.
विरोधी संघातील खेळाडूंचे केले कौतुक
याशिवाय पंतने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा आणि मॅच विनिंग खेळी करणाऱ्या हेन्रिक क्लासेन यांचे कौतुकही केले. पंत म्हणाला की, “वास्तवात त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली आणि सामना हातून दूर नेला. अपेक्षा आहे की, पुढील सामन्यात आम्ही सुधारणा करू. आता आम्हाला उरलेले तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.”
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १४८ धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ४० धावा केल्या. तसेच इशान किशन (३४ धावा), दिनेश कार्तिक (नाबाद ३० धावा) यांनीही योगदान दिले. प्रत्युत्तरात १४९ धावांचा बचाव करण्यात भारताचे गोलंदाज अपयशी ठरले. एकट्या भुवनेश्वर कुमारने १३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. मात्र हेन्रिच क्लासेनच्या वादळाला लवकर रोखण्यात त्यालाही अपयश आले. क्लासेनने ४६ चेंडूत ८१ धावा करत सामना जिंकवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-दक्षिण आफ्रिकेतील सामन्याला ओडिसाच्या CM पटनायक यांनी लावली उपस्थिती, गांगुलीशीही गाठभेट
रोहितविना दुबळी पडतेय टीम इंडिया, रिषभच नव्हे, राहुल आणि विराटही मिळवून देऊ शकले नाहीत विजय
भारताने सामना गमावला, पण भुवनेश्वरला ४ विकेट्सने मोठा फायदा, महत्वाच्या यादीत अश्विनला टाकले मागे