जोहान्सबर्गच्या (Johannesburg) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी २४० धावांचे आव्हान दिले आहे. दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ( ५ जानेवारी ) भारतीय संघाचा संपूर्ण डाव २६६ धावांवर संपुष्टात आला होता. या डावात रिषभ पंत (Rishabh Pant) स्वस्तात माघारी परतला होता. पण, त्याने बाद होऊन माघारी जात असताना असे काही कृत्य केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Rishabh Pant viral video)
रिषभ पंत ज्यावेळी फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी भारतीय संघाचे ५ फलंदाज माघारी परतले होते. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar pujara) भारतीय संघाला चांगल्या स्थितीत आणले होते. त्यावेळी रिषभ पंतला हनुमा विहारी (Hanuma Vihari) सोबत मिळून भागीदारी करायची होती. परंतु, त्याने नको त्या वेळी नको तो शॉट खेळला आणि बाद होऊन माघारी परतला.
तर झाले असे, भारतीय संघाचा दुसरा डाव सुरू असताना ३९ वे षटक टाकण्यासाठी कागिसो रबाडा (Kagiso Rabada) गोलंदाजीला आला होता. त्यावेळी कागिसो रबाडाने ऑफ साईडच्या दिशेने गुड लेंथ टप्प्याचा चेंडू टाकला. ज्यावर रिषभ पंतने स्टेप आऊट होऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, बॅटचा कडा लागला आणि तो बाद होऊन माघारी परतला. बाद होऊन माघारी जात असताना त्याने पॅव्हेलियनमध्ये जोरात बॅट फेकली. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/addicric/status/1478666807779086336
रिषभ पंतचा हा शॉट पाहून अनेकांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि सुनील गावसकरांनी (Sunil gavaskar) देखील त्याच्यावर टीका केली आहे. गौतम गंभीरने टीका करत म्हटले की, “पुजारा आणि रहाणेने भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. रिषभ पंतने २० ते २५ धावा केल्या असत्या तर त्या खूप कामी आल्या असत्या. परंतु, त्याने नको असलेला शॉट खेळला आणि बाद होऊन माघारी परतला. त्याने जो शॉट खेळला ती बहादुरी नव्हे, तर मूर्खपणा आहे. असे सामने कसोटी क्रिकेटमध्ये अपेक्षित नाहीये.”
महत्वाच्या बातम्या :
जोहान्सबर्गवर अश्विनची मोठ्या विक्रमाला गवसणी! कुंबळेनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा दुसराच भारतीय
वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी
नक्की पाहा :